Home महत्वाची बातमी शहरालगत मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करा….. मनसेचे उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन…

शहरालगत मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित बंदोबस्त करा….. मनसेचे उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन…

48

यवतमाळ शहरालगतच्या इचोरी, गोधणी, जामवाडी, चौसाळा, किटाकापरा या भागांमध्ये शेतकर्‍यांच्या मनात भितीचे वातावरण असून या परिसरात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार सुरू आहे. अलिकडच्या काही दिवसात अनेक गुरेढोरे, बकर्‍या व इतर प्राणीमात्रांचा बळी या वाघामुळे गेलेला आहे.

याविषयी मनसेच्या एका शिष्टमंडळाने वन उपमुख्यवनसंरक्षक वायभासे यांना निवेदन देऊन या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा तसेच वन विभागामार्फत वनपरिक्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या लागवडीला लावलेल्या कुंपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला वन्यप्राणी रोही,रानडुक्कर नुकसान करत आहे यासंदर्भात मनसेचे जिल्ह्याचे नेते अनिल हमदापूरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी शेतकरी शेतमजूर आपला जीव मुठीत घेऊन उदरनिर्वाहासाठी शेतात राबत आहेत परंतु वन विभाग मात्र याबाबत कुठेही गांभीर्याने तर करताना दिसत नसल्याचा आरोप अनिल हमदापुरे यांनी केला. या बाबत वनविभागाला विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कोणीही तक्रार नोंदविली नाही अशा स्वरूपाचे उडवाउडवीचे उत्तर देण्यात येते. अगोदरच आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांवर आपल्या गाई, बकर्‍या, शेळी, बैल गमाविण्याची वेळ आली आहे. वनविभागामार्फत या सर्व परिसरात तात्काळ गस्त वाढविण्यात यावी तसेच या वाघाला जेरबंद करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा सोबतच वनविभागामार्फत नुकत्याच करण्यात आलेल्या लागवडीला वनविभागाने कुंपन केल्यामुळे जंगलातील प्राणी त्यात रोही, रानडुक्कर व इतर प्राणी शेतकर्‍यांच्या शेतामध्ये धुडगुस घालत आहे. ऐकीकडे वन्यप्राण्यांसाठी असलेल्या जंगलात वनविभागाने कुंपन केल्यामुळे त्यांची धाव आता गावाकडे व शेतकर्‍यांच्या पीकाकडे सुरू आहे. वनविभागाने आपल्या जंगलातील लागवडीला केलेले कुंपन तात्काळ काढावे व जंगल परिसराला लागून असलेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर शासनामार्फत तात्काळ कुंपन उभारून शेतकर्‍यांना त्यांच्या नुकसान भरपाई म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व यवतमाळ शहरालगतच्या मुक्त संचार करणार्‍या वाघाला तात्काळ जेरबंद करून यवतमाळकर जनतेला या भितीच्या वातावरणातून मुक्त करावे, अशा स्वरूपाची मागणी मनसेच्या वतीने वनमंत्री यांना निवेदनाद्वारे अनिल हमदापुरे, विनोद दोंदल, लकी छांगाणी, बबलू मसराम, सौरभ अनसिंगकर व इतर मनसे कार्यकर्त्यांनी केली..