Home यवतमाळ न्यू लर्निग पॉईंट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेमध्ये महात्मा गांधीजी जयंती सोहळा संपन्न

न्यू लर्निग पॉईंट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेमध्ये महात्मा गांधीजी जयंती सोहळा संपन्न

29
यवतमाळ – न्यू लर्निग पॉईंट इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेमध्ये आज दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच विद्यार्थ्यांनी जयंती निमित्य चित्र काढले व रंगविले आणि विद्यार्थ्यानी आजच्या दिवशी वेगवेगळ्या वेशभूषा साकारल्या जसे (महात्मा गांधीजी, कस्तुरबा गांधी इत्यादी) जयंती निमित्त विद्यार्थी वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसले. विद्यार्थ्यांनी गांधी जयंतीच्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला बालकांमध्ये उत्साह होता, कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री अनिल गायकवाड तसेच संचालिका सौ अश्विनीताई गायकवाड, श्री देवराव फटींग सर यांनी प्रतिमेचे पूजन केले तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक सुद्धा केले, याबरोबरच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.