Home बुलडाणा साखरखेर्डा परिसरात भगर खाल्ल्यामुळे अनेकांना विष बाधा ,

साखरखेर्डा परिसरात भगर खाल्ल्यामुळे अनेकांना विष बाधा ,

53

 

उडाली खळबळ अनेकांवर उपचार सुरू

अमीन शाह

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात रात्री भगर भगरीचा पीठ खाल्ल्या मुळे अनेकांना विष बाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून या मुळे एकच खळबळ उडाली असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार साखरखेर्डा येथील काही किराणा दुकानातून काही लोकांनी नवरात्र देवी उपवासा करिता भगर व भगर पिठाची खरेदी केली होती रात्री त्यांनी याचे सेवन केले होते
त्यामध्येच काही दुकानदारांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी निकृष्ट दर्जाची भगर आणून पिपळगाव सोनार येथे भोळ्या भाबड्या भक्तांना विकली आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथे अनेक पेशंट हे काही खाजगी दवाखान्यात तर काही प्राथमिक आरोग्य केंद्र साखरखेर्डा येथे उपचार घेत आहेत काही पेशंटची प्रकृती खालवलयामुळे त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे ,

—-////———————————–/

काही रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आले होते त्यांच्यावर आम्ही उपचार केले काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती असून आम्ही त्यांची माहिती घेत आहोत किती लोकांना त्रास झाला सद्या सांगता येणे कठीण आहे ,

वैधकीय अधिकारी ,

डॉ , संदीप सुरुशे ,