Home यवतमाळ शिवसेना (उबाठा) गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

शिवसेना (उबाठा) गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

36

यवतमाळ – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना युवा सेना सचिव वरून जी सरदेसाई यांच्या मार्गदर्शनानुसार यवतमाळ जिल्ह्यातील वनी राळेगाव उमरखेड पुसद विधानसभेचे आढावा बैठक नवनियुक्त युवासेना विस्तारक धीरज जी खोडस्कर युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल लोपेकर युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रामगृह यवतमाळ येथे घेण्यात आली.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वनी राळेगाव उमरखेड पुसद येथील पक्ष संघटनेच्या अहवाल यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुखांनी युवासेना विस्तारक धीरज जी खोडसकर यांच्यासमोर मांडला. पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून पक्ष संघटनेचा विस्तार करण्यात करिता संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे नवीन युवकांचे पक्ष संघटनेत सहभाग नोंदविणे, युवकांसाठी रोजगार मिळावे आयोजित करणे. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता हेल्पलाइन नंबर सुरू करणे, नवीन पदाधिकारी नियुक्ती, गाव तिथे शाखा तयार करणे, महाविद्यालयांमध्ये कॉलेज कक्ष स्थापन करणे व त्याद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता प्रयत्न करणे अशा अनेक विषयांवर युवासेना विस्तारकांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राळेगाव विधानसभेचे उपजिल्हाप्रमुख मिथुन कुटे, अजिंक्य शेंडे हर्षद साकला युवासेना विधानसभा प्रमुख मनीष मस्के विधानसभा सरचिटणीस शिवराम चिडे, तालुकाप्रमुख प्रवीण डोहे निलेश बेलेकर गणेश राजूरकर अजय जुमनाके ओम कुसुंगवाड मयूर ठाकरे शहर प्रमुख प्रणित यवतकर गणेश राजूरकर तसेच उपतालुकाप्रमुख तालुका सरचिटणीस तालुका समन्वयक विभाग प्रमुख शाखाप्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.