Home यवतमाळ पर्यावरण संवर्धनासाठी ई-वेस्ट संकलनाचा प्रचार शुभारंभ

पर्यावरण संवर्धनासाठी ई-वेस्ट संकलनाचा प्रचार शुभारंभ

10

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे हस्ते विमोचन

यवतमाळ (प्रतिनिधी) प्रयास यवतमाळ तर्फे निसर्ग रक्षणासाठी २५ आँक्टोबरपर्यंत ई-वेस्ट संकलन मोहीम आणि स्पर्धेच्या प्रचारकार्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचेहस्ते प्रचारसाहित्याचे विमोचन करून झाला. यावेळी अध्यक्ष डॉ. विजय कावलकर, सुधाताई पटेल, अश्विन सवालाखे, अमोघ व्होरा, शशिकांत पकाले, प्रमोद यादव, अमोल साखरकर, प्रवीण लिंगावार,
बजरंग राठी, गौरव गावंडे, अमोल गड्डमवार, उदय सज्जनवार आदी उपस्थित होते.
धोकादायी असलेल्या ई-वेस्टपासुन जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी व या दुर्लक्षित विषयी जनजागृती होण्यासाठी ४ गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वत्र इलेक्ट्रीक, इलेक्ट्राँनिक, इंधन, बँटरीवर आधारित वस्तुंचा वापर प्रचंड वाढला आहे. प्रत्येक घर, आँफिस, बॅक, हाँस्पीटल, इंडस्ट्री, दुकाने, शाळा, काँलेज आदी सर्वच ठीकाणी या वस्तु वापर झाल्यावर मोठ्या प्रमाणात पडुन राहतात. त्यामुळे पर्यावरणासह जीवसृष्टीचीही हानी संभवते. या ई-वेस्टच्या दुष्परिणामांचीच माहिती सर्वापर्यत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी या मोहीम आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत वैयक्तिक, शालेय व महाविद्यालयीन, संस्था व संघटना तसेच गृहनिर्माण सोसायटी असे चार गट करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त ई-वेस्ट संकलित करणाऱ्यांना गटनिहाय समारंभपुर्वक मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहेत. विजेत्यांसह यामध्ये उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, रोपटे, पुस्तक, प्रशस्तीपत्रकाने गौरविण्यात येणार आहे. १०० किलोपेक्षा जास्त ई-वेस्ट संस्थेमार्फत थेट जागेवरुन संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व निसर्गस्नेही यवतमाळकरांनी या निशुल्क स्पर्धेत स्वयंस्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन प्रयास यवतमाळ तर्फे करण्यात आले आहे.