Home यवतमाळ आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ

आसेगाव देवी येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ

31

बाभूळगाव तालुक्यातील आसेगांव देवी येथे आदिशक्ती जगदंबा मातेचे प्राचीन देवालय असून ३ ऑक्टोबर पासून येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.

काल येथे घटस्थापना झाली असून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आई जगदंबेच्या चरणी आता नवही दिवस आसेगांव देवी येथे भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. आसेगाव देवी येथील आदिशक्तीच्या देवालयाची मोठी आख्यायिका आहे इ.स.१६७० मधे आसेगाव देवी येथे मराजी नावाचे भक्त होऊन गेले.
मराजी हे दिवसभर गावातील गोमाता जंगलामध्ये चारायला न्यायचे.त्यांनी अहोरात्र गोमातेची सेवा केली ही सेवा पाहून जगदंबा मातेने त्याना साक्षात जगदंबा मातेने दर्शन दिले.त्यांच्या भव्य दिव्य दर्शनाने मराजी हे प्रभावी झाले.दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथील संत श्री मुंगसाजी महाराज यांचे परम शिष्य श्री गोघलेदास महाराज यांच्या काव्य संगरालयामध्ये आसेगाव देवी येथील मराजी महाराजाबद्दल लिहिलेले आहे.
एके दिवशी मराजी आपले गुरे ढोरे घराकडे वळवित होते त्याच वेळी आई जगदंबेने त्याना दर्शन दिले तेव्हा तू मला तुझ्या घरी घेऊन चल तिथेच तुझ्याकडून समाजाचे कल्याण होईल चांगले कार्य घडेल तेव्हा पुढे चालत असताना तू चालत चालत पुढे जा मागे वळून बघू नको असे देवी मातेने मराजी याना सांगितले परंतु मराजिनी मागे वळून बघितले त्याच ठिकाणी आदिशक्ती जगदंबा माता गुप्त झाली त्यांनतर त्याच ठिकणी आई जगदंबेची स्थापना झाली त्या काळी मातीचा परकोट बांधून मंदिराची निर्मिती करण्यात आली होती आज त्याच ठिकाणी भव्य स्वरूपात मंदिराचे निर्माण झाले आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून येथील देवस्थानचा विकास चालू आहे येणाऱ्या भाविकासाठी भक्तनिवासाची व्यवस्था लाईट व्यस्थत मंदिर सुशोभीकरण इत्यादी काम चालू आहे लवकरच भव्य मंदिराचे काम सुद्धा मंदिर समिती चालू करणार आहे या उत्सवात ह.भ.प पुरुषोत्तम महाराज याचे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच बुधवार दि ९ ऑक्टोबर रोजी गुरुदेव म्युझिक ग्रुप व अंध कलाकारांचा भव्य जगराता चा कार्यक्रम आयोजित केला आहे . १० ऑक्टोबर रोजी ग्रंथ दिंडी व महाप्रसाद ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्या पासून आहे
याचा लाभ सर्व भाविक भक्ताने घ्यावा असे आवाहन मंदिर प्रशासन व ग्रा.प तर्फे करण्यात आले आहे.