Home विदर्भ राज्य विभागीय अध्यक्ष पदी अनमोल चव्हाण यांची निवड

राज्य विभागीय अध्यक्ष पदी अनमोल चव्हाण यांची निवड

40

भूपेंद्र रंगारी – जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटना (नों.क्र.ए डबल्यू बी २९३९/२०१५)द्वारे ‘शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद (धाराशिव ) इथे मा. श्री. अनमोल चव्हाण यांची ‘राज्य विभागीय अध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली..
महाराष्ट्र राज्य- नागपुर विभागअंतर्गत नागपुर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्हा ची जबाबदारी सोपवण्यात आली..आणि सत्कार करण्यात आले…..
विभागाअंतर्गत जिल्ह्यातील विविध संवार्गीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्यालायीन विविध समस्या व अडचणी या शासन दरबारी सोडविण्यात येतील.
महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष न्यायसंगत,शासन दरबारी सर्व संवर्गीय आरोग्य कर्मचारी बंधु-भगिनीचे हित जोपासनारे व त्यांच्या समस्याना वाचा फोडणारे संघटनात्मक अभ्यासू मा. श्री. काकासाहेब वाघमारे,यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष आर. सी. पाटील, सरचीटणीस राजाराम मुळे, संघटनेचे विविध पदाधिकारी, राज्य महिला अध्यक्ष व पदाधिकारी , सर्व जिल्हाध्यक्ष व शेकड़ो च्या संख्यने संघटनेचे पदाधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.