Home यवतमाळ शामबाबू खंदार यांचे कडून अंजी नृ शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट

शामबाबू खंदार यांचे कडून अंजी नृ शाळेला जलशुद्धीकरण यंत्र भेट

38

घाटंजी ( तालुका प्रतिनिधी ) – नुकतेच तालुक्यातील अंजी नृ. येथिल प्रतिष्ठित नागरिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री. शामबाबू खंदार यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ जि. प. शाळा अंजी नृ शाळेला जलशुद्धीकरण यंत्र व जलशितल यंत्र भेट दिले.
यानिमित्त त्यांनी शाळेशी आपले नाते आजही घट्ट असल्याचे समाजाला दाखविले आहे. शाळा ही समाज सुधारनेचे माध्यम असून,समाजाने शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.अशी भावना शामबाबूनी व्यक्त केली.
अशा दानशुर व्यक्तीचा ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती,व गावकरी यांचे वतीने शामबाबूचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी गोपाल डंभारे सरपंच,सौ भारती महल्ले अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,सौ वर्षा कांबळे उपसरपंच, माणिकराव मेश्राम, गजानन पारधी,भास्कर वेट्टी मुख्याध्यापक, कैलास मेश्राम पोलिस पाटील,राजु शुक्ला, स्वप्निल मंगळे,प्रणव वाघ, योगिता महल्ले,दुर्गा नेहारे,शितल गोहणे,सिमा शेडमाके, सुनील चौधरी,अश्विनी नारायणे,प्रेमदास राठोड,राजू शेंडे,कु.किरण चिखलकार,पुजा चिंतावार, सविता किनाके, श्रीमती अनुसया वाघाडे आदी उपस्थित होते.