Home यवतमाळ नगर परिषदेकडून किरकोळ साहित्याची विक्री?

नगर परिषदेकडून किरकोळ साहित्याची विक्री?

10

ट्रकभरून माल गेला तरी कुठे ?
गुरुदेवच्या तक्रारीची सीएमोकडून दखल

यवतमाळ : नगर परिषदेतील लोखंडी खुर्च्या,लाकडी कपाट,पथदर्शक दिवे,सिग्नल दिवे,खिडक्या,लाकडी टेबल यासह अन्य किरकोळ साहित्याला काही ट्रकमध्ये भरून नेण्यात आले. परंतु,याबाबत साशंकता असल्याने गुरुदेव युवा संघाने केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाने दखल घेतली आहे.यात गैरप्रकार झाला असेल तर दोषींवर कारवाईची हमी त्यांनी दिली आहे.

१८,१९ व २० सप्टेंबरला नगर परिषदेसमोरून जवळपास दहा ट्रकमधून साहित्य दूरवर कुठेतरी नेण्यात आले,असा आरोप गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी थेट मुख्यमंत्री सचिवालयाकडे तक्रारीतून केला होता.
त्यांच्या या तक्रारीची दखल घेण्यात आली असून साहित्याची परस्पर विक्री झाली असेल
तर दोषींवर कठोर शासन केले जाईल,अशी हमी दिली आहे.गुरुदेव युवा संघाकडून सामाजिक कार्यासोबतच भ्र्ष्ट अधिकारी तसेच कार्यालयावर नजर ठेवल्या जाते.यातच नगर परिषदेकडून गैरप्रकार झाल्याचा संशय गेडाम यांना आहे.त्यामुळे त्यांनी या प्रकारची जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्षात तक्रार केली आहे.
लोखंडी खुर्च्या,लाकडी कपाट,पथदर्शक दिवे,सिग्नल दिवे,खिडक्या,लाकडी टेबल यासह अन्य किरकोळ साहित्याचा लिलाव करण्याची घोषणा पालिकेने केली असेल तर याबाबत खुलासा जाहीर करावा,असे आव्हान गेडाम यांनी दिले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरवा करावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली.यावेळी यावेळी गुरुदेव युवा संघाचे भाऊराव वासनिक,चंकी चावला,जगन,जुहीचावला पवार,सब्बल सिंग,नेवला,सुहास कांबळे,समाधान रंगारी,तसेच मामा तकलीफचंद उपस्थित होते.

लिलाव झाला नाही – गुरुदेव
साहित्य विक्रीबाबत पालिकेकडून कुठलाही लिलाव झाला नसल्याची आम्हास खात्री आहे तरीही पालिकेने याबाबत खुलासा जाहीर केल्यास मी तक्रार मागे घेईल परंतु या प्रकरणात दोषींना पाठीशी घालण्यात आले तर जनआंदोलन उभे केले जाईल,याची प्रशासनाने नोंद घ्यावी.