जनतेसमोर नवा पर्याय म्हणून देऊ शकतात तगडे आव्हान
पुसद:- पुसद विधानसभा मतदार संघामध्ये नव्यानेच मनसेमध्ये प्रवेश घेतलेले अश्विन जयस्वाल निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी त्या संदर्भात मोर्चे बांधण्यास सुरुवात केलेली आहे त्यांच्या या मोर्चा बांधणीमुळे जनतेसमोर नवा पर्याय उभा राहून प्रस्थापितांना ते तगडे आव्हान देऊ शकतात.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार करून सत्तेमध्ये जाण्याचा राजमार्ग निर्माण केला आहे. देशातील राजकीय पक्षांपैकी मनसे हा एकमेव विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारा पक्ष असून राज्याच्या विकासाचे व्हिजन आणि कृती आराखडा जनतेसमोर सादर सुद्धा करण्यात आला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मनसेला चांगले दिवस येतील अशी अपेक्षा राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी पुरोगामी विचारांना सोबत घेवुन प्रखर हिंदुत्ववादी मतांची प्रतारणा केल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला.याचा धागा पकडत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारल्याने राज्यातील अनेक हिंदुत्ववादी विचारसरणीचे युवक त्यांच्या पक्षात सामील होत आहे. यामध्ये पुसद येथील भाजप चे पदाधिकारी अश्विन जयस्वाल यांनी सुध्दा मनसे मध्ये जाहीर प्रवेश करून पुसद विधानसभा निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असुन त्यांना याठिकाणी मनसेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आश्विन जयस्वाल यांचा पुसद तालुक्यातील चांगलाच जनसंपर्क असुन त्यांनी याच्या जोरावर पुसद नगराध्यक्ष पदासाठी आपल्या पत्नीला भाजपच्या उमेदवारीवर निवडणुक लढविण्यास उतरविले होते यामध्ये त्यांचा अल्प मताने निसटता पराभव झाला.त्यानंतरही त्यांनी आपला जनसंपर्क व समाज सेवेचे कार्य सुरूच ठेवले .जयस्वाल यांनी पुसद विधानसभा क्षेत्रात उतरून मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली असुन यादरम्यान त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीत वेगळे चित्र नक्कीच बघावयास मिळणार आहे.अश्विन जयस्वाल यांच्या दावेदारी मुळे या ठिकाणच्या नाईक घराण्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणारा आहे.त्यामुळे जयस्वाल राज ठाकरेंच्या करिष्म्यावर याठिकाणी बाजी मारतात का हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.