जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची ऐसी तैशी ,
जाता जाता आमदार साहेबांनी दिलेल्या कचरा गाड्यांचे गावकऱ्यांना दर्शनच झाले नाही ,
अमीन शाह ,
सिंदखेडराजा मतदार संघातून ,
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठ्या साखरखेर्डा ग्रामपंचायत च्या दुर्लक्षपणामुळे बस स्टँड , आठवडी बाजार जाफराबाद म्होल्ला व गावात इतर ठिकाणी कचरा गाडी बंद असल्यामुळे कचऱ्याचे ढीग लागले आहे गेल्या महिन्यातच मा , जिल्हाधिकारी साहेबांनी एक आदेश काढून उघडयावर कचरा फेकणाऱ्या विरुध्द कार्यवाही करण्याचे एक पत्र काढले होते मात्र साखरखेर्डा ग्रामपंचयत पर्यंत हे पत्र पहोचलेच नसल्याचे दिसते गावात पसरलेल्या कचऱ्या संदर्भात येथील कर्तवयदक्ष ग्रामसेवक ज्ञानेश्वर चनखोरे व कर्तवयदक्ष सरपंच सुनील भाऊ जगताप यांना दि ,4 डिसेंम्बर रोजी नागरिकांनि फोन करून सांगितले असता लवकरच आम्ही गावात सफाई अभियान राबवून स्वछता करू कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येईल असे सांगन्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत गावात साफ सफाई करण्यात आली नाही येथील ग्राम पंचायत ने तत्कालीन सरपंच महेंद्र भाऊ पाटील यांच्या कार्यकाळात एक ऐपे कचरा गाडी व ट्रॅक्टर घेण्यात आला होता त्या नंतर 2022 ला 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून एक टाटा एस कचरा गाडी खरेदी करण्यात आली ती गावात मोजक्या ठिकाणी म्हणजे मेन रोडवर सुरू होती मिळालेल्या माहिती नुसार ग्राम पंचायत च्या मालकीची 2020 साली खरेदी करण्यात आलेली ऐपे कचरा गाडी गायब झाली आहे आज त्याचा गावात कुठेच पत्ता नाही आमच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली कचरा गाडी कुठे गेली अथवा विकण्यात आली का ?असा प्रश्न येथील नागरिक करत आहे ,
तीन गाड्या गेल्या कुठे ,?
जाता जाता मतदार संघाचे आमदार डॉ , राजेंद्र शिंगणे साहेबांनी येथील ग्रामपंचायतीला तीन कचरा गाड्या त्यांच्या निधीतुन उपलब्ध करून दिल्या होत्या या संदर्भात सर्व वृत पत्रात तशया बातम्याही प्रकाशित करण्यात आली होत्या फोटो सेशन ही करण्यात आले होते मात्र दोन महिने झाले तरी या गाड्या गावातील रस्त्यावर काही दिसल्या नाही त्या मुळे या कचरा गाड्या फक्त फोटो काढण्या पुरत्या आणण्यात आल्या होत्या की काय अशी शंका गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी साहेबांनी या कडे त्वरित लक्ष केंद्रित करून घाणीच्या विळख्यातून येथील नागरिकांची सुटका करावी अशी मागणी केली जात आहे ,
शौचालयाची समस्या ,
जवळपास 22 हजार लोकसंख्या असलेल्या गावात आठवडी बाजारात एक शौचालय बांधण्यात आले होते मात्र देखभाली आभावी कचऱ्याच्या ढीगाऱ्या मुळे ते बंद पडले दुसरा शौचालय येथील पशु वैधकीय दवाखान्यात बांधण्यात आला मात्र उदघाटन आभावी तो ही कुलूप बंद अवस्थेत पडून आहे ,