अमीन शाह
बुलडाणा ,
आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपिस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून कार सह 6 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेहकर परिसरातील चोपडे ले आउट भागात ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी प्रमुख अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र्य पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने 26 ऑक्टोबर रोजी मेहकर परिसरात छापा टाकला असता एक इसम गांजाची वाहतूक करत असल्याचे दिसून आले.
गणेश किशोर दिक्षित (24 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी डोणगांव येथील रहिवासी असून, चारचाकी वाहनात 11 किलो गांजा वाहतूक करताना तो आढळून आला. त्याच्याकडील चारचाकी वाहन, 11 किलो 600 ग्राम गांजा असा एकूण 6 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी गणेश दिक्षित याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
मेहकर पोलीस करतात काय ?
आज मेहकर येथे मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला मेहकर पोलिसांच्या नाकावर टिचून स्थानिक गुन्हा अनवेशन विभागाने ही कार्यवाही केली आहे मग प्रश्न हा उपस्थित होतो की मेहकर पोलीस काय करतात तिथे असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्मचारी करतात तरी काय ?