Home बुलडाणा चिखली शहरामध्ये आदर्श आचार संहिता चे वाजले तीन तेरा नाम फलक पडले...

चिखली शहरामध्ये आदर्श आचार संहिता चे वाजले तीन तेरा नाम फलक पडले उघडे ,

25

 

चिखली ‌‌एकनाथ माळेकर

महाराष्ट्र राज्यात आदर्श आचारसंहितेचे वारे वाहू लागले आहे परंतु त्याला चिखली नगरपालिका अपवाद आहे की काय असे चिखली येथील फलकावरून नगरपालिका प्रशासनाकडून राजकीय पक्ष चिन्हे, नावे इत्यादी झाकण्याचे तसेच राजकीय जाहिरात होर्डिंग फ्लेक्स काढण्याचे काम करण्यात आले होते . परंतु, काही ठिकाणी भाजप कडून तसेच इतर पक्षाकडून शहर भरात शेकडो सार्वजनिक ठिकाणी पक्षाचे चिन्ह स्थानिक प्रतिनिधीचे नाम उल्लेख कायमस्वरूपी रंगविण्यात आले आहेत. त्याकडे नगरपालिका प्रशासना चे दुर्लक्ष असल्याचे दिसत असून त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे.
*तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर भाजपचा शाखेचा नाम फलक आहे त्यावर पेपर लावून तात्पुरते झाकण्यात आले होते परंतु गेल्या दोन दिवसापासून हा फलक उघडा झाला असून चिखलीत सरवात मोठ्या चौकात असलेला हा नाम फलक निवडणूक अधिकारी यांच्या लक्षात येत नाही का आदर्श आचारसंहिता ही सामान्य नागरिका करिताच काय हा प्रश्न सामान्य नागरिक विचारात आहे*
शहरात ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी असे पक्ष चिन्ह व नाव रंगविण्यात आले आहे. ते नगरपालिका प्रशासन तथा निवडणूक विभागाकडून तात्काळ मिटविण्यात यावे. शिवाय आदर्श आचारसंहिता भंगाच्या घटना घडणार नाहीत, याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचा अभिनिवेश किंवा दबाव न बाळगता कारवाई करावी हि सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा सुरू आहे ,