शोध कार्य सुरू ,
अमीन शाह
बुलडाना
जमिनीत गुप्त धन सापडले आहे आम्ही तुम्हाला कमी भावात सोने देतो असे आमिष दाखवून पालघर येथून काहींना वैरागड येथे बोलावून त्यांच्या जवळचे 15 लाख रुपये घेऊन दोन भामटे पळून गेल्याची घटना आज रात्री घडली असून दाखल तक्रारी वरून अंमडापुर पोलीस जवळच्या जंगलात चोरट्यांचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार गुरूनाथ शंकर दळवी वय 45 वर्ष व्यवसाय हॉटेल रा. पिंपलास पोस्ट खरवली ता. वाडा. जि. पालघर
यांनी अमडापुर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दिली कि, फिर्यादी चे स्वतः चे हॉटेल रिव्हररीच व्हिलेज रिसॉटे पिंपलास येथे व्यवसाय असून.3 दिवसा पूर्वी फिर्यादी चा भाचा उदय हरचंद घोलप यांस मो.क्रं. 7757045721 या वरुन अनोळखी व्यक्तीने फोन करून मी राजु कांबळे बोलतो माझे जवळ जुने सोने आहे खरेदी करणे असल्यास ग्राम वैरागड ता. चिखली जि. बुलढाणा येथे बोलाविले होते. काल दि. 25/10/2024 रोजी सकाळी 07.30 वा चे सुमारास गुरुनाथ व त्यांचे भाऊ राजेश यशवंत दळवी व भाचा उदय हरीशचंद घोलप असे स्वताःची कार क्रं. MH-05 FJ-3586 वैरागड येथे आले व भाचा उदय याने त्याचे आरोपी राजु कांबळे यास फोन केला असता त्याने वैरागड खामगाव रोडवरील सहयाद्री जवळ महादेव मंदीरा जवळ बोलावले तेथे गेल्यानंतर राजु कांबळे व त्याचे सोबत असलेला नाव माहित नाही मो.क्रं. 8432436206 असा असलेला असे दोघे जण आमचे जवळ आले मंदीराच्या पाठी मागील शेतात घेवुन गेले व त्यांनी त्यांचे जवळ जुन्या काळातील सोन्याच्या दिड किलो च्या गिन्न्या आहेत 30 लाख रुपया मध्ये विकणे आहे असे सांगितले तेंव्हा राजेश यशवंत दळवी याने त्यांना तुम्ही सोनाराकडे आमचे सोबत चला सोनारा कडुन गिन्न्या सोन्याच्या आहेत याची खात्री पटल्यानंतर तुम्हाला पैसे देतो असे म्हणाला तेंव्हा राजु कांबळे याने आम्ही तुमच्या सोबत येवु शकत नाही वाटल्यास थैली मधील एक गिन्नी सोनाराकडे घेवुन जा व खात्री पटल्यानंतरच सोने घ्या असे म्हणाला व गिन्या असलेल्या थैली मधुन एक गिन्नी काडून गुरुनाथ दळवी जवळ दिल्याने त्यांनी बाजुला जावुन राजेश दळवी याचे जवळ असलेल्या PMI METAL डिटेक्टर मशीन व्दारे राजु कांबळे याने दिलेल्या अंदाजे 01 ग्रॅम वजनाच्या पिवळ्या रंगाच्या धातुच्या गिन्नी ची तपासणी केली असता मशीन ने सदर गिन्नी ही सोन्याची असल्याचे दर्शविले, राजु कांबळे याने दिलेली धातुची गिन्नी ही सोन्याची असल्याची फिर्यदीची खात्री झाल्याने ते परत राजु कांबळे जवळ गेले व सांगितले की आम्ही उदया 15 लाख रुपये घेवुन येतो असे सांगुन पालघर येथे परत गेलो. आज दि. 26/10/2024 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास परत वैरागड येथे महादेव मंदीरा जवळ येवुन उदय याने राजु कांबळे याचे नो.क्र. 7757045721 वर फोन करुन त्यास सोन्याच्या गिन्न्या खरेदी करण्यासाठी 15 लाख रुपये घेवुन आल्याचे सांगितले काही वेळा नंतर राजु कांबळे हा त्याचे सोबत अंदाजे 60 वर्ष वयाचा, चेहरा गोल काळे कपडे, चष्मा अशा वर्णनाचा व दुसरा वय 50 वर्ष बांधा ठेंगणा रंग गोरा, अंगामध्ये पॅन्ट शर्ट अर्शा वर्णनाच्या 02 इसमा सह फिर्यादी व त्यांच्या भावा कळे आला व त्याचे जवळ पिवळ्या रंगाच्या कापडी पिशवी मध्ये असलेल्या पिवळ्या रंगाच्या धातुच्या गिन्न्या आम्हाला दाखविल्या व थैली मधुन एक पिवळ्या रंगाची धातुची गिन्नी काढून दिली व परत तपासुन घ्या असे म्हणाले तेंव्हा आम्ही परत राजु कांबळे याने दिलेल्या धातुची गिन्नी ची PMI METAL डिटेक्टर मशीन मध्ये तपासणी केली असता मशीन ने सदर धातुची गिन्नी सोन्याची असल्याचे दर्शविले राजु कांबळे याने सोन्याची गिन्नी परत घेवुन त्याचे खिशामध्ये टाकली.. राजु कांबळे याचे जवळ असलेल्या गिन्न्या धातुच्या गित्न्या या सोन्याच्या असल्याची फिर्यादि व सहकाऱ्यांची खात्री झाल्याने, राजु कांबळे यास त्याचे जवळ असलेल्या प्रत्येकी 01 ग्रॅम वजना च्या एकुन दिड किलो वजना सोन्याच्या गिन्न्या 15 लाख रुपया मध्ये खरेदी करुन त्यास 15 लाख रुपये रोख देवुन राजु कांबळे यांचे जवळ असलेल्या दिड किलो सोन्याच्या गिन्न्या विकत घेतल्या व PMI METAL डिटेक्टर मशीन मध्ये उर्वरीत पिवळ्या धातुच्या गिन्न्याची तपासणी करण्यास सुरवात केली असता. मशीन ने उर्वरीत धातुच्या गिन्या या सोन्याच्या नसल्याचे दर्शविले तेंव्हा फिर्यादी व त्यांचे भाऊ राजेश दळवी असे दोघांनी राजु कांबळे व त्याचे सोवत असलेल्या दोघांना आवाज देवुन परत बोलावले असता ते सर्व जण गडबडी मध्ये जंगलाच्या दिशेने जंगला मध्ये पळुन गेले. तेंव्हा माझी खात्री झाली कि, राजु कांबळे व त्याचे सोबत असलेल्या लोकांनी मला खोटे सोने देवुन माझी 15 लाख रुपयाने फसवनुक केली आहे.
दि.25/10/2024 रोजी सकाळी 07.30 ते आज दि. 26/10/2024 रोजी 08.00 वा दरम्यान राजु कांबळे खरे नाव माहित नाही व त्याचे सोबत असलेल्या वरील वर्णनाच्या 02 लोकांनी त्यांची नावे माहित नाही यांनी मला खरे सोने दाखवुन फिर्यादी कडुन 15 लाख रुपये घेवुन ख-या सोन्याच्या ऐवजी प्रत्येकी 01 ग्रॅम वजनाच्या एकुन दिड किलो वजना पिवळ्या रंगाच्या धातुच्य गिन्या देवुन फिर्यादी चि 15 लाख रुपयाने फसवणुक केल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास अमडापुर चे ठाणेदार निखिल निर्मळ करीत आहे.