Home यवतमाळ तेली समाजातील युवा,तडफदार व्यक्तिमत्व मनिष शिरभाते यवतमाळ विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात

तेली समाजातील युवा,तडफदार व्यक्तिमत्व मनिष शिरभाते यवतमाळ विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात

33

यवतमाळ – तेली समाजातील युवा,तडफदार व्यक्तिमत्व मनिष शिरभाते आगामी विधान सभा निवडणुकीत आपले नशीब आजमवणार आहे. त्यांनी समाजातील समस्यांना वाचा फोडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी राजकीय क्षेत्रात उतरून समाजाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. समाजाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत, त्यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे लहान व मोठ्या वयोगटातील कार्यकर्त्यांना एकत्र आणले आहे.

त्यांच्या उमेदवारीमुळे तेली समाजात उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यांची मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. विकास, रोजगार, शिक्षण, आणि समाजातील न्याय हक्क यांसारख्या मुद्यांवर त्यांचा भर असून, या निवडणुकीत त्यांनी समाजाला मजबूत पायावर उभं करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

तेली समाजाने मोठ्या प्रमाणावर त्यांना समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे, आणि त्यामुळे निवडणुकीत त्यांचे यश शक्य आहे अशी आशा समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.