Home यवतमाळ सर्वांची तुतारी वाजवणारा माणूस – मा. आमदार संदीप बाजोरिया

सर्वांची तुतारी वाजवणारा माणूस – मा. आमदार संदीप बाजोरिया

13

यवतमाळ – महाविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाकडून एबी फॉर्म मिळालेला नाही. तरी सुध्दा मी तुतारी चिन्हावर अपक्ष लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदमध्ये मा. आमदार संदीप बाजोरीया यांनी दिली. अपक्ष उमेदवारांकरीता असलेल्या चिन्हामध्ये तुतारी चिन्ह असून ते आपण मागणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी याकरीता संदीप बाजोरीया हे प्रयत्नशील होते. मात्र त्यांना उमेदवारी न देता काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी देण्यात आली. अधिकृत उमेदवारीची घोषणा होण्यापूर्वी संदीप बाजोरीया यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा सुरु झाली होती. सदर या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याविरुध्द कसे षडयंत्र रचले याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यवतमाळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. नुकताच पुन्हा एका तरुणावर आमदाराच्या जवळच्या व्यक्तत्रिने चाकुने हल्ला केला. अशा घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था आहे कि नाही? असा प्रश्न संदीप बाजोरीया यांनी उपस्थित केला. मी उपस्थित केलेले जाहिरनाम्यातील मुद्दे आता इतर उमेदवार उचलून धरत असल्याचे त्यांनी सांगीतले. यवतमाळात आपल्याविरुध्द षडयंत्र रचल्या गेले नसते तर आपण महाविकास आघाडीचे काम केले असते. तसेच मी दारव्हा, राळेगाव येथे जाऊन आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे प्रचाराचे काम करणार असल्याचे उपस्थित पत्रकारांना संदीप बाजोरीया यांनी सांगीतले.