Home यवतमाळ यवतमाळच्या नीता रेड्डी कुंटावार जागतिक सायकलपटूंच्या यादीत झळकल्या

यवतमाळच्या नीता रेड्डी कुंटावार जागतिक सायकलपटूंच्या यादीत झळकल्या

11

२१ हजार किलोमीटर सायकलिंग; ‘स्ट्रावा’ने घेतली दखल

यवतमाळ : कौटुंबिक पसाऱ्यातून वेळ काढत स्वत:चा छंद जोपासणारी गृहिणी समाजात क्वचितच आढळते. त्यातही सायकलिंगसारख्या क्रीडा प्रकारात महिलांचा पुढाकार कमी आढळतो. मात्र यवतमाळच्या नीता रेड्डी कुंटावार यांची सायकलपटू म्हणून विशेष नोंद झाली आहे. तब्बल २१ हजार किलोमीटर सायकल चालवून त्यांनी नवा विक्रम केला आहे.

त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘स्ट्रावा’ या जगप्रसिद्ध क्रीडा ॲपने घेतली असून नीता रेड्डी कुंटावार या ॲपमध्ये जागतिक सायकलपटूंच्या यादीत झळकल्या आहेत. यवतमाळातील पहिल्या महिला सायकलपटू म्हणून नोंद झाल्याबद्दल नीता कुंटावार यांना स्थानिक सायकल रायडर्सच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. येथील गणेश सायकल स्टोअर्सच्या वतीने स्थानिक जीनातील गणपती मंदिराच्या प्रांगणात रविवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन मानकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रमाकांत कोलते, प्रा. उदय नावलेकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नीता रेड्डी कुंटावार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. सत्काराला उत्त्रर देताना नीता कुंटावार यांनी एक लाख किलोमीटर सायकल चालविण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले. दररोज किमान ५० किमी सायकलिंग करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरूवातील लोक काय म्हणतील, हा प्रश्न छळत होता. मात्र सायलने नवा आत्मविश्वास दिला, असे त्या म्हणाल्या. सुरूवात केली तेव्हा अनेक अडचणी आल्या. मात्र पती, मुलं व कुटुंबियांनी सहकार्य करून साथ दिल्याने हा पल्ला गाठता आल्याचे त्यांनी सांगितले. आतपर्यंत ५० किलोमीटर सायलिंगचे ३०० अर्धशतक तर १०० किलोमीटरचे १७ राऊंड पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. नीता रेड्डी यांनी आता जिल्ह्यातील महिला, मुलींना सायकलपटू म्हणून घडवावे, असे आवाहन यावेळी पाहुण्यांनी केले. कार्यक्रमास दिलीप राखे, व्यंकट कुंटावार, डॉ.आशिष गवरशेट्टीवार, नितीन पखाले, मनीष गुलवाडे, डॉ.अतुल माईंदे, मनोज उम्रतकर, प्रफुल्ल मानकर, प्रीती मानकर, गोविंद बजाज, डॉ.हर्षल झोपाटे, राहुल सारवे, वसंत राठोड, प्रभाकर डफळ, रामभाऊ तांबोळी, सुरेश भुसंगे, नीलेश नारसे, डॉ.भागवते, सतीश चौधरी, मोहन भुजाडे, राजेश लोणकर, राजेंद्र खरतडे, जितेंद्र बागेश्वर आदी उपस्थित होते.

Previous articleयादीत नाव असलेले पत्रकार बाकी सर्व चित्रकार – विनोद पत्रे
Next article
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.