राज्याचा राजकारण तापलं ,
अमीन शाह
जालना येथे माजी मंत्री रावसाहेब दानवे व शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या भेटीत फोटोसेशन दरम्यान एक कार्यकर्ता आडवा आला, त्याला बाजूला करण्यासाठी दानवेंनी लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विरोधकांनी यावरून दानवे व भाजपवर टीका केली. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सभेत हा व्हिडिओ दाखवून दानवेंवर टीका केली. तथापि, संबंधित कार्यकर्ता शेख अहेमद यांनी स्पष्ट केले की, ते दानवेंचे जुने मित्र असून शर्ट अडकला असल्याने ते पुढे गेले होते, लाथ मारल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगितले.
भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओवरून रावसाहेब दानवे यांच्यावर टीकाही केली जातेय. अर्जुन खोतकर यांचा सन्मान करताना त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला लाथाडल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय.
महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उभे होते. अर्जुन खोतकरांना शुभेच्छा देण्याकरता रावसाहेब दानवे यांनी त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ दिला. त्यानंतर एकत्र फोटो काढण्याकरता दोघेही उभे राहिले. मात्र, तेवढ्यात रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या बाजूलाच उभा असलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारली. फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला लाथ मारल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, त्याने काहीतरी मिश्किल टिप्पणी केल्याने त्याला लाथाडल्याचंही काही जण म्हणत आहेत.
या घटनेवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शरद पवार म्हणाले, “त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं, याचं ते उदाहारण आहे.” तर या मुद्द्यावरून संजय राऊतांनीही संपप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “ही तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना याबाबत विचारा. रावसाहेब दानवे यांच्याविषयी किती वेळा आम्ही बोलायचं? कार्यकर्त्यांना अशा लाथा घालताना गारगार वाटतंय का? असंही देवेंद्र फडणवीसांना विचारा. “प्रत्येकाने सत्ताधारी आणि विरोधकांनी सर्वांचा आदर केला पाहिजे. वाचाळवीरांनी वाचाळपणा बंद करावा”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली होती अन , इथंच हा प्रकार घडला होता.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी तीन-चार दिवसांतच घराबाहेर पडून जनसंपर्कास सुरुवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे निवडणूक लढवत आहे ,