अमरावती -गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीचा सस्पेन्स काल खऱ्या अर्थाने निकालाच्या दिवशी येऊन संपला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील 288 जागांसाठी सुरू असलेल्या रणधुमाळीमधील उमेदवारांनी केलेले दावे प्रतिदावे, शह काटशहाचे राजकारण,एक्झिट पोलचे अंदाज जागच्या जागेवर राहिले. सर्वाधिक दोनशे पार जागा जिंकून भाजप प्रणित महायुती सत्तेत बसली. एवढे मोठे यश या निवडणुकीत मिळेल हे स्वप्नातही कोणाला वाटले नसेल. लोकसभेपासून अमरावती जिल्हा महाविकास आघाडी साठी पोषक ठरलेला असताना कालच्या निकालावरून हे स्पष्ट झाले कीं मतदारांनी आपली मतांची टक्केवारी 65 टक्क्यावर का नेवून ठेवली? ती महायुतीमधील उमेदवारांच्या विजयी पारड्यात टाकून मोकळी झाली.या जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित उमेदवारांनी या निवडणुकीत जिकरीची लढत दिली पण ते आपली विजयश्री खेचून आणू शकले नाही.ते राजकारणात अनुभवी मातब्बर असतानाही मायबाप मतदारांचा अंडर करंट समजू शकले नाही.ओळखले ते फक्त राणा दांपत्यांनी.हीच खरी महाविकास आघाडीसाठी शोकांतिका ठरली.आपण बिनदिक्कतपणे निवडून येऊ शकतो असे निवडणूकीं आधी ठामपणे सांगणारे दिग्गज उमेदवार या अंडर करंट ला बळी पडले. अपवाद होता फक्त रवी राणांच्या बडनेरा मतदार संघातील. ते कसं तर या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील हाय वोल्टेज ठरलेल्या लढतीत अमरावती च्या नवनीत रवी राणा यांनी आपली निवडणूक प्रतिष्टेची बनवली होती. दुदैवाने त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला .त्यांचा पराभव करण्याकरीता सर्व पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी नेत्यांनी एकत्रित येऊन त्यांची पराकाष्टा पणाला लावली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील लोकांनाही कळलं होतं की नवनीत राणांचा पराभव हा पराभव नसून राणा दाम्पत्यांना थांबवण्याच षडयंत्र होतं. त्याचमुळे हा पराभव अमरावती जिल्ह्यातील जनतेला चांगला जिव्हारी लागला होता . तेव्हापासून अमरावती जिल्ह्यातील जनतेने ठरवलं होतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवूनच देऊ. मग येथूनच सुरु झाला खऱ्या अर्थाने एका वाघिणीचा प्रतिशोध. लोकसभेत युती धर्म असतानाही मित्र पक्षाने रवी राणा व नवनीत राणांना कोंडीत पकडले होते. मित्र पक्षांकडून युती धर्म पाळल्या गेला नाही.गेल्या पंधरा वर्षापासून रवी राणा यांची अमरावती जिल्ह्यातील राजकारणात असलेली पकड विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराने सैल होऊ लागली होती. जिल्ह्यात बहुजन समाजाचा एक प्रेरक चेहरा म्हणून रवी राणा यांची ओळख आहे . याचा सर्व अंदाज घेऊन रवी राणा यांनी आपल्या समर्थकांसह गेल्या काही महिन्यात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. लोकसभेतील मतदारांची झालेली नाराजी दूर करण्यास त्यांना यश प्राप्त झाले. आंबेडकरी तसेच बहुजन चळवळीतील बुद्धिजीवी लोकांशी सल्लामसलत करून रणनीती आखण्यात आली. विधानसभा निवडणुकांच्या तिकीटा जाहीर होताच बडनेरा मतदारसंघातील निवडणूक रवी राणा यांचे कार्यकर्ते व मतदारांनी हातात घेतली त्यामुळे त्यांना या निवडणुकीत 68 हजार चे जवळपास मताधिक्य मिळू शकले.हे आकडे सर्वासाठी थक्क करणारे होते. लोकसभा निवडणुकीत आलेला वाईट अनुभव लक्षात घेऊन पुन्हा नव्या जोमाने राणा दांपत्य जिल्ह्यातील लोकांच्या सेवेत समर्पित झाले.कामाला लागले. तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवू लागले. हे करत असताना दोघांसाठी या जिल्ह्यातील
ही लढाई होती अस्मितेची. ही लढाई होती प्रतिशोधाची. समाज माध्यमातून होणाऱ्या पदोपदी अपमानाच्या व वैयक्तिक स्तरावरील प्रतिक्रियांनी रवी राणा व नवनीत राणा यांचे हौसले परास्त करण्याचा बराच प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला.पण ते हौसले येणाऱ्या काळात कसे बुलंद झाले हे कोणाला कळलेच नाही.नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत हरविण्यासाठी गनिमी कावा करून राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या राणा दाम्पत्याना अखेर मतदारांनी भर भरून आशीर्वाद दिला. महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्ने बघणारे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतकार्यात आपलाही खारीचा वाटा असावा असे नेहमीच राणा दाम्पत्याना वाटत राहले आणि देवेंद्र फडणवीस देखील रवी राणा व नवनीत राणा यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहले हे सर्वश्रुत आहेच. केंद्रातील मोदी सरकार हे राज्याच्या विकासासाठी नेहमीच कटीबद्ध राहले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तो पायाभूत असो कीं सामाजिक विकास हा घडवून आणण्याची संवैधानिक जबाबदारी आता ही माननिय देवेंद्र फडणवीस यांची आहे. संविधानाचे संरक्षण,महिलांची सुरक्षितता, त्यांना स्वयं निर्भर बनवणे, बेरोजगारांच्या हाताला काम, शेतकऱ्यांसाठीचे हमीभाव, वृद्धाना सामाजिक व कौटुंबिक संरक्षण, आर्थिक व सुदृढ समाज निर्माण ह्या बाबी ची अंमलबजावणी करण्यासाठी मतदारांनी महायुतीला पूर्ण बहुमताने सत्तेवर आणले आहे. त्याचा एक घटक म्हणून अमरावती मधील जनता रवी राणा यांचेकडे मोठ्या आशेने बघत आहे त्यांच्या आशा पूर्ण करण्याकरिता रवी राणा व नवनीत राणा यांना जनतेने भरभरून आशीर्वाद दिलेला आहे.
काल निवडणूक निकाल जाहीर होताच रवी राणा यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना माझा विजय हा निळ्या व भगव्या वादळाला समर्पित असल्याचे स्पष्ट केले. सत्तेत असल्याशिवाय विकासाचे ध्येय गाठता येत नाही हे राणा दाम्पत्यांना माहीत आहे त्यामुळे राणा दाम्पत्यावर अमरावतीच्या जनतेने जो विश्वास टाकला ही गौरवाची बाब आहे. येणाऱ्या काळात अमरावतीला विकासाचे केंद्र बनविण्यासाठी राणा दांपत्यांचा हातभार नक्कीच लागणार आहे एवढे मात्र निश्चित. त्याचबरोबर जिल्ह्यात आठ पैकी सात ठिकाणी युतीचे उमेदवार निवडून आल्याने आणि ज्यांना खरोखर घरी बसवायचं होतं त्यांना त्यांची जागा जनतेच्या माध्यमातून राणा दांपत्याने दाखवून दिली. त्यामुळे निवडणूक प्रवासातील घेतलेल्या प्रणाचा एका वाघीनीने प्रतिशोध घेतला असेच म्हणावे लागेल.
======================
विनोद पी. गुहे
*स्वीयसहायक आमदार रवी राणा ,.9665835111
======================