धाराशिव / उस्मानाबाद – तुळजापूर येथील रहिवाशी असलेले पोलीस बॉईज शेखर विजयानंद साखरे यांची पोलीस बॉईज असोसिएशन तुळजापूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी शेखर साखरे यांना निवडीचे पत्र दिले आहे. पोलीसांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी शेखर साखरे यांनी आत्तापर्यंत विविध प्रकारची आंदोलने केली आहेत त्याचप्रमाणे विविध प्रकारची निवेदने देऊन पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढविले आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आणि पोलीसांबद्दल त्यांची आत्मीयता व तळमळ पाहून पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी शेखर साखरे यांना तुळजापूर अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
शेखर साखरे यांच्या निवडीबद्दल त्यांच्या मित्र परिवारातून स्वागत होत असून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.