Home यवतमाळ विकास कामांमुळे यवतमाळच्या नागरीकांना होईल फायदा – आमदार मदन येरावार यांची माहिती

विकास कामांमुळे यवतमाळच्या नागरीकांना होईल फायदा – आमदार मदन येरावार यांची माहिती

8

विनोद पत्रे

यवतमाळ शहराकरीता मी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आनला. या निधीतून तुमच्या स्वप्नातील सुंदर यवतमाळ शहर आकार घेत आहे. थोडा त्रास होईल मात्र विकास कामे तसेच सुविधांचा येणाऱ्या अनेक वर्ष नागरीकांना फायदा होणार असल्याची ग्वाही भाजपाचे नेते तसेच माजी आमदार मदन येरावार यांनी हॉटेल एकविराच्या पत्रकार परिषद मध्ये माहिती दिली.

मी ज्यांना ज्यांना पराभूत केले त्यांनी एकत्र येऊन माझ्या विरुध्द चुकीचा प्रचार केला. मी पराभूत झालोतरी शहरातील दोन भाग वगळता इतर भागातील नागरीकांनी मला चांगले मतदान केले असा माझा दावा आहे. गेल्या दहा वर्षात मी अनेक क्लीष्ट अवस्थेत असलेली विकास कामे पुर्ण केली. नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून 900 प्रेक्षक बसतील असे नाट्यगृह तयार झाले आहे. तसेच या ठिकाणी शेड तसेच उर्वरीत स्थापत्ये विषयक कामे करण्यासाठी खनिज विकास निधीतून 81.31 लाख रुपये मंजुर झाले आहे. लवकरच या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती मदन येरावार यांनी दिली. वैशिष्टपुर्ण हेड मधून 60 कोटी मंजुर करुन आनले असून यामध्ये योग भवन, चेनलिक फेनसिंग, सभागृह, ओपन जिम, हायमास्ट लाईट, जॉगिंग ट्रॅक इत्यादी कामे करण्यात आली. नगरोत्थान महाभियान अंतर्गत शहराच्या मलनिस्सारण करीता 520.33 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. सध्या यवतमाळच्या नागरीकांना मिळत असलेले पाणी अमृत योजनेचे आहे. या योजनेअंतर्गत आनखी 250 किलोमिटरची पाईप लाईन टाकून प्रत्तेक घरात कनेक्शन देण्यात येणार आहे. याकरीता 91 कोटी रुपये मंजुर झाले आहे. यवतमाळ नगर परिषद अंतर्गत दैनंदिन घराघरातील कच-याचे संकलन, प्रक्रिया, साफ सफाई, नाले गटार सफाई करण्याचा प्रस्ताव आहे.

• नागरीकांना विविध कामांकरीता शासकीय कार्यालयामध्ये जावे लागते.
त्यांना असुविधा किंवा त्रास होऊ नये म्हणून शासकीय इमारती सुसज्ज करण्यात येत आहे. याकरीता यवतमाळ तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारतीसाठी 17 कोटी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय 8.50 कोटी, उत्पादन शुल्क कार्यालय 14 कोटी, विज वितरण कंपनी 10.50 कोटी, नविन बस स्थानक 12 कोटी, यवतमाळ शहर पोलीस स्टेशन 7 कोटी, अवधुतवाडी पोलीस स्टेशन 9.50 कोटी, जिल्हा पोलीस अधिक्षक इमारत 5 कोटी, शासकीय विश्रामगृह इमारतीसाठी 12 कोटी देण्यात आल्याचे मदन येरावार यांनी सांगीतले.
महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील रस्त्यावर साचलेली माती साफ करण्यासाठी खनिज विकास निधीतून 1.50 कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामुळे रस्त्यावर उडणा-या मातीचा त्रास कमी होणार आहे. पिंपळगाव ऑक्सीजन पार्क व वनविभागातील विविध योजना राबविण्यासाठी 20 कोटी, तिर्थक्षेत्र विकास करीता 3 कोटी, प्रादेशिक पर्यटन विकासात्मक कामे 13 कोटी, मनदेव देवस्थान करीता 5 कोटी, सिध्देश्वर देवस्थान करीता 4 कोटी, दत्त मंदिर चिकणी 1 कोटी, महिला समाज पांगरी महादेव मंदीर यवतमाळ २ कोटी अशा प्रकारे तिर्थक्षेत्र विकासाकरीता सुध्दा कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिल्याचे मदन येरावार यांनी सांगीतले.
सदर पत्रकार परिषदेत उमरखेड येथील नवीन निवडून आलेले आमदार , नितीन भुतडा , राजू पडगिलवार उपस्थित होते.