लोकांच्या समस्या सोडणासाठी जनसंपर्क कार्यालय उघडणार
प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव
देऊळगावमही:मतदारसंघ मागील पंचवीस वर्षांपासून मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासापासून वंचित राहिला आहे. आता या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन विकासकामांचा अवशेष भरून काढण्यासाठी आमदार म्हणून नव्हे तर कामदार म्हणून सदैव जनसेवेत राहील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी दिले. देऊळगावमही येथील लोकनेता प्रतिष्ठानच्या वतीने आमदार कायदे यांचा आज, दि. २८ नोव्हेंबर रोजी नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी होते. माजी आमदार तोताराम कायंदे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, देविदास ठाकरे, इरफान अली, भाजप नेते भगवान मुंढे, दस्तगीरसेठ कुरेशी, हाजी सिद्दीकसेठ मिर्चीवाले, दिलीप सानप, काशीनाथ काकड, गजानन काकड, भगवान नागरे, शेख शगीरसेठ, कचरू बारस्कर, मो.सादिक, खालिक कुरेशी, मो. कलीम, अशोक कोटेचा, माजी सरपंच प्रदीप हिवाळे, माजी सरपंच नारायण मुंढे, भाजपा नेते अरुण कुटे, नारायण मुंढे, शिवानंद कुटे, पुरसा कुटे,गजानन कुटे, श्रीराम कुटे, दत्ता कुटे,सतीश नागरे, परवेज खा पठाण, फरीद कुरेशी, श्रीकृष्ण शिंगणे, संतोष शिंगणे, शेख अजगर यांची उपस्थिती होती. आमदार कायंदे पुढे म्हणाले की, विकास काम करताना जेवढी जबाबदारी माझी आहे तेवढीच जबाबदारी सर्वांची मतदारसंघातील जनतेची आहे जनतेच्या प्रश्नांसाठी शहरात कार्यालय उघडणार असून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी अॅड नाझेर काझी यांनी मतदारांचे आभार मानले. भगवान मुंढे यांनी देऊळगावमही सर्कलमधील प्रलंबित विकासकामे व उजव्या कालव्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी केली. कार्यक्रमासाठी संजय आंधळे, शेख नाजीम, विकास नागरे, सचिन फुकट, प्रशांत जाधव, समीर शेख, गणेश खेत्रे, जयंत काकडे, अंकुर खिल्लारे, प्रविण खिल्लारे, गबाजी सोसे, शिवहरी मांटे, गणेश आंधळे सचिन आंधळे,राजु कुटे,यांनी पुढाकार घेतला होता .