Home नाशिक “भेद कुठ नाहीत हो” पत्रकारीतेत स्वतःला मोठं समजून स्वतःची पाठ थोपटनाऱ्या मोठ्या...

“भेद कुठ नाहीत हो” पत्रकारीतेत स्वतःला मोठं समजून स्वतःची पाठ थोपटनाऱ्या मोठ्या असामीना, वस्तीत,गाव खेड्यातला राबता पत्रकार कळणार कधी?

19

म्हणून तर राबता पत्रकरितेतला वर्ग नेहमीच दुर्लक्षितच ..

नाशिक :: राम खुर्दळ यांजकडून

पत्रकारिता निर्माण झाली ज्या उद्देशाने तो उद्देश किती आपण पाळतो ? आपण जनतेचा आरसा की अजून कोणा कोणाचा? आता याचे उत्तर आपली वाचक, दर्शक जनताच देईल, जनतेला तो अधिकार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे सामान्य माणसाला आधार वाटावा असा हा स्तंभ, बदलला इतका की येथे ही विविध स्थर आले, त्यात वस्तीत, गाव खेड्यात राबणारा नावालाच ओळख पत्रापुरता पत्रकार असलेला घटक मात्र देशोधडीला लागलाय असं थेट म्हणायची आता वेळच आली आहे. कारण स्वतःला मोठ्या असामी समजणारे काही मंडळी शासन प्रशासनाच्या जवळचे, तसेच संघटनाचे बडे नेते यांच्या कडून कितीक वर्षे ग्रामीण तसेच शहरातील राबत्या पत्रकारांसाठी आरोग्य, पेन्शन, शासकीय निवासस्थाने, अधिस्वीकृती, श्रमिक पत्रकार म्हणून मान्यता, अजून मिळालेली नाही, राबत्या पत्रकाराना विविध अशासकीय समित्यावर संधी दिली कुठं? कोणीतरी मोठ्या माध्यमाचा ज्याला गाव खेड्याच्या पत्रकारांचे मूलभूत मुद्दे माहित नसलेला व्यक्ती मंत्र्यांच्या ओळखीने सीफारस होऊन किंवा स्वतःला शिखर संस्था म्हणणणाऱ्या मंडळीना यां समित्यावार संधी मिळते,यामुळे आजही जनतेचा आरसा असलेल्या पत्रकारितेसाठी स्वतःची झिज करणारे असंख्य राबते पत्रकार केलेल्या कष्टाचा मोबदला सोडा हो कुठल्याही मूलभूत गरजा भागवता येत नसल्याने देशोधडीला लागले आहेत, मात्र यातील मोठ्या असामी मात्र स्वतःचे भले करुण मिरवतात, आम्हीच पत्रकारांचे तारणहार समजतात, हे दुर्दैव नाही तर काय?

लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे, हे सर्वाना ठाऊक आहे मात्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात लोक माध्यमे,गट माध्यमे ही येतात हे स्वतःला मोठ्या समजणाऱ्या पत्रकरितेतल्या या मोठ्या आसामीला,त्या त्या घटकाला माहीत आहे का? अरे हो हो बाबा मला माहीत आहे म्हणून हा विषय छेडतो,कारण मी त्यांच्यात राहून त्यांना जाणतो,त्यांच्या अडीअडचणी जाणतो,त्यांच्या लोककलेत गायनात,वादणात,नाटकात ही तितकीच ताकत,जी माझ्या लेखणीत,व माझ्या पत्रकारीतेत म्हणून कोणी काहीही म्हनों मी तरी या घटकांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो,आम्ही वृतपत्र माध्यमातील मंडळी व विडिओ माध्यमातील मंडळी आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलो तरी आम्ही दिमाखात म्हणत असतो की आम्ही जनतेचा आरसा आहोत अस आम्ही नेहमीच सांगत असतो आम्ही खरंच जनतेचा आरसा आहोत आहोत का? मग आम्ही नेमका कोणाचा आरसा बनलोय? असा सवाल व त्याचे उत्तर लोकांमध्ये जाऊन काम करणारे,पाय जमिनीवर असलेले काही पत्रकार चांगल सांगू शकतील.माझ लिहिण आपल्याला कोड्यात वाटलं असल तरी वाचकहो हे खटकत,बोचत,अन राग ही येतो,मात्र लेखणीत घडलेलो असल्याने लेखनी व संवाद त्याला जोडून आंदोलन या व्यतिरिक्त फार काही शक्ति आमच्यात उरली नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकारात लिहिलेल निवेदन स्व खर्चाने त्या त्या शासकीय विभागात पाठवूनही त्या कागदाला उत्तर एकच “आपले निवेदन माहिती व जनसंपर्क विभागास पाठवले आहे” त्या व्यतिरिक्त दुसरे उत्तर मिळत नाही. हे वास्तव आहे. कारण मंत्रालय जनतालय व्हाव अस आम्हाला नेहमी वाटत,मी स्वत बच्चूभाऊंची आंदोलनात मुंबईत होतो,जिथ सामान्य माणसाला तासन तास रखडाव लागत. पोलिस व बाऊन्सर सांगतील तसे गप्प गार बसाव लागत हेही अनुभवलय. हे का होत तर याची जबाबदारी आम्ही घेत नाही,आम्ही व्यवस्थाच्या ताब्यात आहोत,व्यावसायिक मूल्य व त्याला लागून बरंच काही. मग त्यातून आवाज दाबला जातो,तस त्या ग्रामीण भागातील पत्रकारांच ऑफिसातून फोन आला कआय हातातली पोटाची काम सोडून बातमीसाठी जीवाचे रान करतो,बातमी जाते छापल्यावर त्या बातमीच्या बदल्यात होणारे परिणाम त्याचेच प्रसंगी वाईट होणे,शिवीगाळ,प्रसंगी मारहाण,अडवणूक हे काही नव नाही ,मात्र असा राबता वर्ग ही गाव खेड्यात कमी होत आहे. आमचा काळ संघर्षाचा होता,आता कश्याला वाईट होता?अंग राखून झीज घेणारे कमी नाहीत,फार थोडके सडेतोड स्पष्ट आणि जनतेच्या मुद्दे घेऊन लिहितात दाखवतात.आता व्यवसाय,ओळखी,हेतु ठेवून वागणारे अनेक माध्यम कर्मी दिसतील.पत्रकारिता करता करता तो व्यवसाय असला तरी यात ही मूल्य सोडा दुकाने थाटुन पोट भरणारे कमी नाहीत. त्यांची व्यवस्था तसलीच,जिला कसल घेण देण नाही मात्र आज ही वस्तीत गाव खेड्यात पत्रकारिता करणारा जुना जनता वर्ग आहे. कुठली अपेक्षा न ठेवता अखंडित आपले पत्रकारीतेचे काम करतोय,विनामूल्य अथवा अल्प मानधनात,मात्र हक्क अधिकार,आधीस्वीकृती त्याला नाही,त्याच्या आरोग्य,आयुष्याची कुठलीही हमी नाही,बातमीसाठी मारहाण झाली दमदाटी झाल्या तरी न्याय नाही,कुटुंबातील पोटा पाण्याचा वेळ सोडून पत्रकारीतेच वेड व्यासंग असलेल्या अनेक पत्रकारांच्या कुठल्या ही मूलभूत गरजा ह्या स्वतःला मोठ्या समजणाऱ्या शिखर संस्था समजणाऱ्या बड्या आसामी व त्यांच्या संघटना ना नाहीत हे वास्तव आहे.सातत्याने शासनाच्या पत्रकारांच्या आशासकीय समित्यांवर आपले डेरे कायमच राखणारे अनेक जण आहेत त्यांनी ह्या जागा अडवून ठेवल्यात.त्यात पत्रकारांच्या आरोग्यासाठी अपघातात सहाय्य मिळावे म्हणून शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी ही योजना असताना ही नाशिक जिल्ह्यात नाशिक तालुक्यातील एक प्रामाणिक पत्रकार सुरेश भोर यांना एक दमडी मदत मिळाली नाही ,आम्ही वर्गणी काढून उपचार केले,30 वर्षे गावकरी दैनिकात पत्रकारिता करणारा हा पत्रकार त्याला उपचाराला कुठलेही शासकीय सहहाय्य न मिळल्याने त्यांचा मृत्यू झाला,मात्र याचे सोयर सूतक या समित्यांवर असणाऱ्या मोठ्या असामिना नाहीत,कारण पत्रकार भोर गुरुजी सारख्या ग्रामीण पत्रकारांचे आयुष्य व मुद्दे यांना कळतात तरी कुठ? पालकमंत्री नेते शिफारस करतात,स्वतःची संघटना शिखर संस्था करून पदे ठेवायची असे कितीक वर्षे सुरू आहे ,अनेक जाणकार मंडळी ना पत्रकार हल्लविरोधी समिति,पत्रकार कल्याण समिति,आधीस्वीकृती समित्यांवर डावलले जाते,मग तुम्ही किती ही पाठपुरावा करा,हा ताजा अनुभव सामान्य पत्रकारांच्या पत्रकार संरक्षण समिति या मान्यताप्राप्त संघटनेला आला.यामुळ संघटना व पत्रकारांच्या या विविध स्थरात ज्या मोठ्या आसामी आहेत त्या फक्त त्यांच्या सहकार्यांचे बघतात ,त्यांनी या वस्तीत ग्रामीण भागात राबत्या घटकांना संधी दिली कुठ? हे वास्तव आहे ,मग का आम्ही फक्त आंदोलने,निवेदने द्यायचे का? कुठली पत्रकार पेन्शन योजना ? कोणाला मिळते ? कुठली आधी स्वीकृती कोणाला मिळते ? आधी स्वीकृतीत बोगस मंडळी किती ? हे मात्र कोणी लक्षात घेणार नाही, साधे श्रमिक पत्रकार म्हणून मान्यता ही ग्रामीण पत्रकार यांना नाही मग आम्ही केवळ राबायचे गुर ढोर म्हणून का ? याचे उत्तर मागणाऱ्या संघटना नाहीत ,कारण काही संघटना चे नेते मजा करतात मात्र सभासद केवळ निवेदन द्यायला ,अशी गत आहे.
*आमची कुठलीही शिखर संस्था नाही*
पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने आम्ही वारंवार वस्तीत,ग्रामीण भागातील पत्रकारांच्या मूलभूत गरजांसाठी शासनास माहिती विभागास असंख्य पत्र लिहिली,आंदोलने केली मात्र विवंचना कायम आहे. पत्रकारीतेत वतनदार बनलेल्या काही संघटना काही मोठे मंडळी यांनी समित्या ही कायम त्यांचेकडे ठेवल्या जेणे करून त्यात कुठला ही ग्रामीण शहरातील राबता पत्रकार त्यात जायलाच नको. आशे होत राहिले तर पत्रकारीतेत जनतेचा आरसा म्हणून राबणाऱ्या मूल्य पाळणाऱ्य उरल्या सुरल्या सामान्य पत्रकार मंडळीना कोणी वाली नाही हेच खर

आपला ;
राम खुर्दळ. ( राज्यउपाध्यक्ष )

पत्रकार संरक्षण समिति,महाराष्ट्र