Home यवतमाळ पर्यावरण रक्षणासाठी ई-वेस्ट जनजागृतीचा प्रयास….!

पर्यावरण रक्षणासाठी ई-वेस्ट जनजागृतीचा प्रयास….!

5

संवाद सत्राचा सुर : व्यवस्थापन हाच उपाय

एस एल फाउंडेशन, यवतमाळ पब्लीक स्कुल, संदिप शिरभाते विजेते

यवतमाळ (प्रतिनिधी) – दोन वर्षांच्या ड्राईव्हमध्ये ८ हजार किलोपेक्षा जास्त ई वेस्ट संकलित करुन विविध क्षेत्र आणि वयोगटातील दहा हजारावर समाजघटकांमध्ये थेट संवाद साधुन जनजागृती करणारी प्रयास यवतमाळ ही विदर्भातील अग्रणी संस्था ठरली. वृक्षसंवर्धानाबरोबच कचरा व्यवस्थापनातील महत्वपुर्ण घटक असलेल्या ईवेस्ट मॅनेजमेंन्टकरिता उत्स्फुर्त सहभागी झालेल्या यवतमाळकर निसर्गस्नेहींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुस्तक, प्रशस्तीपत्र, रोपाची कुंडी, भेटवस्तु प्रदान करुन गौरविण्यात आले. रविवारी माई निसर्ग दालनात झालेल्या बक्षिस वितरणानिमीत्त झालेल्या जनजागृती संवादात आधुनिक तंत्र युगात ईलेक्ट्राँनिक्सच्या वाढत्या वापरावर ईवेस्ट चे व्यवस्थापन हाच उपाय असल्याचा सुर व्यक्त झाला.
या सोहळ्याचे व संवाद सत्राचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्ष राजश्री धर्माधिकारी, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त मंगला मुन, ओमप्रकाश नगराळे, स्वच्छ संस्थेच्या अध्यक्ष अनसुया छाब्रानी, सुरीटेक्सच्या संचालक महिमा सुरी, शरद पालीवाल, प्रयास यवतमाळचे अध्यक्ष डाँ विजय कावलकर, वैद्यकिय अधिकारी डाँ. महेश मनवर, प्रकल्प अधिकारी अमोघ व्होरा, प्रकल्प समन्वयक अश्विन सवालाखे यांची उपस्थिती होती.
प्रयासवन येथील निसर्गरम्य परिसरात आयोजीत कार्यक्रमाला वृक्षपुजनाने सुरुवात झाली. डाँ विजय कावलकर यांनी प्रास्ताविकातुन प्रयास चा प्रवास उलगडत ई वेस्ट मोहीमेचे वैशिष्य विषद केले. स्पर्धेत संस्था गटात एस एल फाउंडेशनने प्रथम, रोटरी क्लबने व्दितीय तर संकल्प संस्थेने तृतीय विजेतेपद मिळवीले. शैक्षणिक गटात यवतमाळ पब्लिक स्कुलने प्रथम, जायंट्स इंग्लीश मिडियम स्कुलने व्दितीय तर सुसंस्कार विद्या मंदिराने तृतीय पुरस्कार प्राप्त केला. वैयक्तिक गटात राणी अमरावती येथील संदिप शिरभाते यांनी प्रथम, प्रफुल्ल धोटे यांनी व्दितीय तर डाँ. सुचित्रा डवले यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. १०० किलोपेक्षा जास्त ईवेस्ट संकलित करणाऱ्यांना संजीवन रुग्णालयासह जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान आणि मनरेगा विभागांनाही गौरवीण्यात आले. अतिथींनी आपल्या भाषणातुन प्रयास च्या विविध पर्यावरणपुरक उपक्रमांचे कौतुक करित ईवेस्ट संकलन मोहीम व स्पर्धेदरम्यान झालेल्या विशेष कार्यांचा आवर्जुन उल्लेख केला.
जनजागृती संवाद सत्रात ई वेस्ट म्हणजे काय, ई वेस्टमुळे पर्यावरणासह जीवसृष्टीचे होणारे नुकसान कोणते, ई वेस्ट चे व्यवस्थापन कसे शक्य आहे, ई वेस्टवर रिसायकल प्रक्रिया, ई वेस्ट संकलन ते त्याचेवरील होणाऱ्या तंत्रशुध्द प्रक्रियेची तज्ञांनी माहितीपटाद्वारे माहिती दिली. मंगेश खुने यांनी सुत्र संचालन केले तर अमोघ व्होरा यांनी उपस्थितांचे आभार मानले. आयोजनाकरिता सुधीर खोरगडे, सुधाताई पटेल, सुदेश कापर्ती, डाँ विजया कावलकर, प्रशांत बनगिनवार, प्रमोद यादव, संदिप शिवरामवार, उद्य सज्जनवार, अमोल गड्डमवार, महेंद्र गुल्हाने, मधु मुकेश पटवा, दत्ताभाऊ कुळकर्णी, वसंत उपगनलावार, किर्ती राजेश मुक्कावार, विद्या नरहरशेट्टीवार, हेमंत बेलगमवार, डाँ अपर्णा बाहेती, माणिकताई मेहरे, शशीकांत पकाले, विजय अष्टेकर, विजय देऊळकर, गौरव गावंडे, प्रवीण लिंगावार, प्रशांत गोडे, कैलास राठोड आदी प्रयासींनी सहकार्य केले. यावेळी यवतमाळातील विविध संस्था, संघटना, पतसंस्था, शाळा, काँलेज आदी विविध विभागांमधुन आलेले पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट)
*निसर्गस्नेही विजेत्यांचा पर्यावरणपुरक सन्मान*
ई-वेस्ट संकलित करणाऱ्यांबरोबरच या पर्यावरणरक्षक उपक्रमासाठी सेवा देणाऱ्या निसर्गस्नेहींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रोपटे आणि प्रमाणपत्र प्रदान करुन त्यांना गौरवीण्यात आले. यामध्ये आनंद कसंबे, मंगला माळवे, निलीमा दवणे, हितेश पोपट, अनिता खोरगडे, वंशिका पाकडे, अस्मिता व शिवांश कोमलवार कोमलवार, नगर परिषद, उद्योग विभाग, शिक्षण विभाग, टीडब्ल्युजे, प्लाँगर्स, जगदंबा व सावित्री जोतीराव समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. एक ते सव्वा महिन्यांच्या स्पर्धेत चिमुकल्यांसह महिला, वृद्ध, दिव्यांगांनीही स्पयंस्फुर्त सहभाग घेतला. सर्वांना रोपटे, भेटवस्तु आणि प्रशस्तीपत्रासह गौरवीण्यात आले.