Home यवतमाळ यवतमाळ शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट…. गल्ली बोळातील पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यवतमाळ शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट…. गल्ली बोळातील पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

2

यवतमाळ,दि.११ – यवतमाळ शहरातील मुख्य चौकात,मुख्य रस्त्यावर द्विभाजकाच्या मध्यभागी मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात जमावडा असतो.रस्त्यावर येणाऱ्या भरधाव वाहनासमोर आल्याने किती अपघात होऊन अनेक कुत्री अपंग झाली आहेत. या घटना लक्षात घेता नागरिकांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,याबाबतचे निवेदनसुद्धा नगरपालिकेला दिले आहे.

या कुत्र्यांच्या दहशतीमुळे पादचारीसुद्धा भयभीत झाले आहेत.या कुत्र्यांच्या समूहात पाळीव कुत्रीही असतात.असाच प्रकार शहरातील गल्लीबोळातसुद्धा बघावयास मिळत आहे.मोकाट कुत्र्यांनी फेरफटका मारणाऱ्या अनेक नागरिकांना चावा घेतला आहे.ही मोकाट कुत्री येऊ नये म्हणून काही नागरिकांनी आपल्या घरासमोर लाल रंगाचे पाणी भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवल्या आहेत.

कोट —–
यवतमाळ आसपास परिसरात आम्ही आमच्या संस्थेतर्फे अशा कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण यावे यासाठी उपाययोजना करीत असतो.यवतमाळ शहरातील महत्त्वाच्या भागात देखील आम्ही येऊन या भटक्या कुत्र्यांसाठी होणाऱ्या रोगांवर औषध,लस देण्याचा प्रयत्न करू.
– जीत पाटील,पशुधन अभ्यासक तथा वन्यजीव रक्षक,यवतमाळ.

भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या या भागात आहे.अनेक कुत्र्यांना लस दिले पाहिजे.रेबीज होण्याअगोदर लस दिल्यास उपाययोजना होऊ शकतात. पण रेबीज झाल्यानंतर नगरपालिके मार्फत काळजी घेऊन त्यांना पकडून ठेवणे गरजेचे आहे.रेबीजमुळे ३६ ते ४८ तासांमध्ये ते कुत्रा मरण पावते. मेल्यानंतर सुद्धा त्याची नीट विल्हेवाट लावली पाहिजे.
– प्रज्वल तुरकाने(उपाध्यक्ष एम.एच.२९ हेल्पिंग हॅण्ड वन्यजीव संघटना,यवतमाळ.

Previous articleपर्यावरण रक्षणासाठी ई-वेस्ट जनजागृतीचा प्रयास….!
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.