Home महाराष्ट्र ‘देवा भाऊ’, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या

‘देवा भाऊ’, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या

188

स्थानिक नेत्यांमध्येही मुंडेविरोधात नाराजी

 पुणे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन सादर केले होते.पंरतु,केवळ निवेदन सादर करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.२५) व्यक्त केले. १५ दिवस लोटून देखील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी तीन आरोप अद्यापही फरार आहेत.या सर्व प्रकरणात अगोदर पासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीचे नाव समोर आले आहे.अशात मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या चौकशी समितीला निष्पक्ष तपासाठी मुंडेंना मंत्रिमंडळातून दूर ठेवले पाहिजे, असे पाटील म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या मतदार संघात गेल्या काही काळात गुन्हेगारी वाढली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मतदार संघातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात ते अपयशी ठरले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे.मुंडेंमुळे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.मुंडेंनी त्यामुळे राजीनामा देणेच योग्य, अशी बीड तसेच मस्साजोग येथील ग्रामस्थांची भावना असल्याचे पाटील म्हणाले.

बीड मधील अनेक नेत्यांनी मुंडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.सत्ताधारी भाजप चे आमदार सुरेश धस यांनी बीड चे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावर अशी विनंती केली आहे. स्थानिकांचा देखील मुंडेंच्या नेतृत्वावर विश्वास राहीलेला नाही. अशात जनभावना लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांचा राजीनामा घ्यावा,या मागणीचा पुनरोच्चार पाटील यांनी केला.

——