यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय ?
आज दि. 30 जानेवारी 2025 रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस यांना,जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री,मा.ना.श्री संजय राठोड यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीचे वचन दिले होते.
याच संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाची आठवण देण्याकरिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, शहर प्रमुख चेतन शिरसाट, जिल्हा सचिव तुषार देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश सावरकर, संजय राठोड, उपतालुकाप्रमुख गजानन पाटील, राजेंद्र धोटे, कमल मिश्रा, शेतकरी संघटनेचे विठ्ठल घाडगे पाटील, बाळूभाऊ निवल, प्रमोद बुटले, सचिन पिल्लेवार, रिजवान हाश्मी, राहुल वखरे, किशोर शंभरकर, इत्यादी शिवसैनिक व शेतकरी हजर होते.