स्थानिक यवतमाळ येथील अमलोकचंद महाविद्यालयाचा खेळाडू ६८ शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदाचा मानकरी ठरला.
सविस्तर असे की, १९ वर्षे खालील ६८शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा महाराष्ट्रातील नांदेड येथे पीपल्स कॉलेज च्या स्टेडियमवर खेळल्या गेली. या चॅम्पियनशिप मध्ये भारतातील समस्त राज्यांतून एकूण १४ संघ रणांगणात उतरले होते. यामध्ये महाराष्ट्रातर्फे चयन केलेल्या बेसबॉल संघामध्ये, यवतमाळ येथील अमलोकचंद महाविद्यालयाचा खेळाडू दक्ष नितीन रामटेके याची निवड महाराष्ट्राच्या संघात झाली होती. ही राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्यासाठी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अत्यंत चुरशीचे सामने जिंकत महाराष्ट्र संघ पोहोचला तेव्हा, महाराष्ट्राच्या संघाचा अंतिम सामना हा छत्तीसगड संघाशी झाला. या चुरशीच्या लढतीत बेसबॉल महाराष्ट्र संघाने बाजी मारत, राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा चषक जिंकला. त्यामध्ये यवतमाळ येथील खेळाडू दक्ष नितीन रामटेके याने महत्त्वाची भूमिका बजावली.
अंतिम सामन्याच्या लढतीत महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड अशा सामन्यात महाराष्ट्राने बाजी मारली. या महाराष्ट्राच्या संघात यवतमाळ येथील खेळाडू दक्ष नितीन रामटेके हा सुवर्णपदकाने सन्मानित झाला. तो आपल्या विजयाचे श्रेय आई-वडील तसेच शारीरिक शिक्षक पियुष चांदेकर, पंकज शेलोटकर, भाकीत मेश्राम, निशांत सायरे यांना देते. तर त्याचे मनस्वी अभिनंदन अमलोकचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. विजय बाबू दर्डा तसेच संस्थेचे सचिव मा. प्रकाशजी चोपडा, प्रतिष्ठित संचालक मंडळ, प्राचार्य मा. आर. एम. मिश्रा, उप प्राचार्य व्ही. सी. जाधव, शारीरिक शिक्षक संचालक प्रा. किशोर तायडे, क्रीडा शिक्षक संजय पंदिरवाड (मा. सैनिक), व समस्त प्राध्यापकवृंद, तद्वतच यवतमाळ जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र तरोणे, प्रा. विकास टोणे, नरेंद्र फुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक मंगेश गुडदे, क्रीडा अधिकारी सचिन हरणे व यवतमाळ येथील समस्त बेसबॉल/सॉफ्टबॉल क्रीडाप्रेमी इत्यादींनी केले.