Home यवतमाळ माजी मंत्री मदन येरावार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

माजी मंत्री मदन येरावार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

46

१६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान, भारतमातेचे पुजन, विद्यार्थीना स्कूल बैग वाटप.

प्रतिनिधी | यवतमाळ

प्रजासत्ताक दिन व माजी मंत्री मदन येरावार यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून भारतीय जनता पार्टी यवतमाळ विधानसभेच्या वतीने रविवार, दि. २६ जानेवारी रोजी टिळक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराची सुरवात भारतमातेच्या पुजनाने करण्यात आली होती. यावेळी रक्तदान शिबिरात १६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक रुग्णालयात अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी यवतमाळ विधानसभेच्या वतीने प्रजासत्ताक दिन व माजी मंत्री मदन येरावार यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १६३ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. शिबिरासाठी सकाळपासून रक्तदात्यांनी गर्दी केली होती. तसेच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून शिबिर आयोकांचे कौतुक केले. शिबिराचे सयोजक योगेश पाटिल, बंटी श्रीवास, सूरज जैन, प्रथमेश बत्तलवार, चितामन पायघन, उमेश राठौड़ हे होते. सुष्टि आश्रम शाळा मोहा व विवेकानंद छात्रावास, तेजस्विनी छात्रावास या ठिकाणी स्कूल बैग वितरित करण्यात आल्या.
व पूर्व संध्येला शहरातील महापुरुषा चे पुतळा व परिसर नितिन गिरी, विजय खड़से यांनी स्वछता अभियान राबवले
या कार्यक्रम साठी राजु पड़गीलवार, जिल्हा महामंत्री, शंतनु शेटे शहराध्यक्ष, चितामन पायघन, तालुका अध्यक्ष, किर्ती राउत, लक्ष्मीकांत लोळगे, शैला मिरझापुरे, भारती जाठे, माया शेरे, रोहित राठौड़, मनीष गंजीवाले, चंदू बीडवई, सुजीत राय, अश्विन बोबचे, विजय खडसे, विजय राय,कार्तिक ताजने, संगीता कासार, मोहन देशमुख, दिनेश चिंडाले, आकश धुरट, इरफ़ान मलनस, शुभम सरकाले, डॉ दीपक शिरभाते, अशोक लुटे मनोज ईगोले,साधना काळे, बबलू राठौड़, शशांक बोरले, अभिषेक वखरे, अंकुश पांडे, मयूर लोखंडे, जुगल तिवारी, सागर महाजन, रेखा नंदुरकर, नंदा जीरापुरे, निर्मला विनकरे,रंजना पालेकर यांची उपस्थितीती होती..