सामाजिक कार्यकर्ते चंदकांत खरात यांचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:-स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारताचे संविधान ग्रंथ व उद्देशिका वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांच्या अध्यक्षतेखाली आमदार मनोज कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना नेते छगनदादा मेहेत्रे, डॉ. रामप्रसाद शेळके, मोहम्मद सिद्दीकी, डॉ. भगवान खरात, ॲड. रवींद्र एडके, तहसिलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसिलदार सायली जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ॲड. विजय सूनगत व इतर मान्यवरांच्या हस्ते विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत व उद्देशिका वितरीत करण्यात आले.
भारतीय लोकशाही बळकट ठेवण्यासाठी भारताचे संविधान किती महत्त्वाचे आहे हे डॉ. खरात यांनी पटवून दिले. याप्रसंगी श्री व्यंकटेश महाविद्यालय,न प छत्रपती श्री शिवाजी महाराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, देऊळगाव राजा कनिष्ठ महाविद्यालय, दीनदयाल विद्यालय, सहकार विद्या मंदीर, महात्मा फुले कृषी तंत्र विद्यालय यांच्यासह विविध शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान व उद्देशिका वितरीत करण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक क्षेत्रातील नागरिकांना भारताचे संविधान ग्रंथ, उद्देशिका व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व उद्देशिका वाचन या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मधुकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदीप हिवाळे यांनी केले. अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल चंद्रकांत खरात यांचा मान्यवरांच्या हस्ते कौटुंबिक सत्कार करण्यात आला.