Home यवतमाळ गरिबांवर अन्याय,श्रीमंतांना पाठराखण – यवतमाळच्या भाजी विक्रेत्यांचा आक्रोश!”

गरिबांवर अन्याय,श्रीमंतांना पाठराखण – यवतमाळच्या भाजी विक्रेत्यांचा आक्रोश!”

72
यवतमाळ,दिनांक 31 जानेवारी.
यवतमाळ शहरातील भाजी विक्रेते गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या जागेसाठी संघर्ष करत आहेत.कधी प्रशासनाला निवेदन,कधी मोर्चे,तर कधी आंदोलनं करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.त्यांना रस्त्यावरून हटवले जात आहे,रोजच्या कमाईवर टाच आणली जात आहे.पण याच रस्त्यावर ट्रॅव्हल्सवाल्यांना मोकळीक मिळते, त्यांची वाहने निर्धास्त उभी राहतात.मग न्यायाच्या चौकटीत हा दुजाभाव का?
जे हातावर पोट असणारे,कष्टाच्या घामाने घर चालवणारे आहेत,त्यांच्यावर प्रशासनाचा बडगा,आणि गर्भश्रीमंतांसाठी मोकळे आकाश? मग तो पोलीस प्रशासन असो,नगरपालिका असो,मंत्री असो किंवा लोकप्रतिनिधी—गरीबांच्या न्यायासाठी कुणीही का उभे राहत नाही?
“सत्ता,प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना गरिबांची किंमत आहे का?” हा प्रश्न आज भाजी विक्रेत्यांच्या मनात ठिणगीसारखा पेटलेला आहे.कितीही लढा दिला तरी दडपशाहीच सहन करावी लागते,ही वस्तुस्थिती आहे.शहरातील भाजी विक्रेत्यांना त्यांच्या हक्काच्या जागा का मिळत नाहीत? त्यांच्यासाठी प्रशासन का जागं होत नाही?
यवतमाळच्या प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी,अन्यथा हा आक्रोश लवकरच मोठ्या आंदोलनाचे रूप धारण करेल. “जर श्रीमंतांना नियम लागू होत नाहीत, तर गरीबांना बळी का द्यायचे?” हा सवाल आज शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे!