Home यवतमाळ यवतमाळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची दुर्दशा – प्रशासनाचे दुर्लक्ष?

यवतमाळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची दुर्दशा – प्रशासनाचे दुर्लक्ष?

136

यवतमाळ,दिनांक 31जानेवारी.

30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशभर हुतात्मा दिन साजरा केला गेला.गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी,राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बळकटीसाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.मात्र,यवतमाळ शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अवस्था पाहून त्यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लाज वाटेल,असे चित्र आहे.


गांधी भवन परिसरात उभा असलेला हा पुतळा सध्या धुळखात आहे.परिसराची स्वच्छता नाही,पुतळ्याची रंगरंगोटी नाही, आणि विद्युत मोटर पंपासह संपूर्ण बांधकाम जीर्ण अवस्थेत आहे.विशेष म्हणजे,रात्रीच्या वेळी मद्यपी येथे येऊन दारू पितात,यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व धोक्यात आले आहे.
प्रा.पंढरी पाठे,व कॉम्रेड सचिन मनवर यांनी या गंभीर स्थितीबाबत आवाज उठवला आहे.”गांधीजींचा पुतळा हा केवळ एक शिल्प नाही,तर त्यांच्या विचारांचा वारसा आहे.त्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत,”असे त्यांनी म्हटले.
स्थानिक प्रशासन,पालकमंत्री,स्थानिक आमदार आणि संबंधित जबाबदार व्यक्तींनी या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी घ्यायला हवी.अन्यथा,केवळ जातीय समीकरणासाठी पुतळे उभारायचे आणि त्यांचे व्यवस्थापनच करायचे नाही, याला काही अर्थ उरत नाही.नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी या प्रश्नावर आवाज उठवून प्रशासनाला जबाबदार धरण्याची गरज आहे.