Home महत्वाची बातमी गेल्या दोन वर्षा पासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास पोलिसांनी केले जेरबंद

गेल्या दोन वर्षा पासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात दरोडेखोरास पोलिसांनी केले जेरबंद

200

सययद नजाकत

जालना , दि. ०८ :- एडीएसच्या रात्रगस्तीवरील पथकाने २२ वर्षांपासून फरार असलेल्या दरोडेखोर भुज्या यास घनसावंगी तालुक्यातील हातडी येथून अटक केली.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील माजी सरपंच सुभाष गोलेच्छा यांच्या घरावर २४ फेब्रुवारी १९९९ रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून २१ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यावेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत गोलेच्छा यांच्या बहिणीचा मृत्य झाला होता. या दरोड्यातील भुज्या बाप्या चव्हाण (रा. हातडी) वगळता इतर सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते.गुरुवारी रात्रीं गस्तीवर असलेले एडीएसचे पो. नि. यशवंत जाधव यांना भुज्या हा हातडी शिवारात आला असल्याची माहिती मिळाली त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून भुज्या यास मध्यरात्री जेरबंद करून बदनापूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.यशवंत जाधव, सहा. फौजदार एम.बी. स्कॉट, रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, संदीप चिंचोले यांची पार पाडली.