नवी दिल्ली , दि. ०८ :- ( राजेश भांगे ) आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिल्लीतील महिला कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. येणारं सरकार तरी महिलांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या धोरणांजी अंमलबजावणी करणार का? हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीमधील रोहिणी परिसरात काल रात्री शुक्रवारी साधारण रात्री 9.30 वाजता एका महिला सब-इन्सपेक्टरची गोळी घालून हत्या करण्यात आली. प्रीती ही महिला सब-इन्सपेक्टर दिल्लीतील पटपडंगंज इंडस्ट्रियल भागात तैनात होती. रात्रीच्या वेळी ती आपली ड्यूटी पूर्ण करून मेट्रोने रोहिणी मेट्रो स्टेशन पोहोचली. आणि त्यानंतर मेट्रो स्टेशनहून आपली घरी जाण्यासाठी निघाली. प्रीती साधारण स्टेशनपासून 50 मीटर अंतरावर पोहोचली असेल तोच मागून एक तरुण आला व त्याने प्रीतीवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतीच्या शेजारुन गेलेल्या एका कारच्या आरशावर लागली. तर एक गोळी प्रीतीच्या डोक्याला लागली. आणि तेथेच तिचा मृत्यू झाला. लागलीच मारेकरी तेथून फरार झाला.
घटनास्थळी असलेल्या एकाने पोलिसांना 112 वर कॉल करुन याबाबतची माहिती दिली. यानंतर तातडीने फॉरेंसिक टीमलाही तिथे पाचारण करण्यात आला. या घटनेचा पुढील तपासात दिल्ली पोलिसातील जीएस पीएसआय दीपांशू यांनी प्रीतीवर गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता त्यांनी त्याच पिस्टलने स्वत:वर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाल येथील एका गाडीत त्यांचा मृतदेह सापडला. 2018 मध्ये दोघेही दिल्ली पोलिसात रुजू झाले होते. दोघेही बॅचमेट होते. सध्या पोलीस या हत्येमागचा तपास घेत आहेत.