हनिफ शेख
देऊळगांव राजा , दि. ०८ :- स्थानिक पोलिस ठाण्यात दि.५ फेब्रुवारी रोजी मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष शेख कदीर शेख चांद यांच्या नेतृत्वात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भोकरदन तालुक्यातील पळसखेडा मूर्तड येथील रहिवासी असलेला समाजकंटक दगडू जाधव याने आपल्या मोबाईल क्रमांक ९६०७०५७४५७ या नंबरवरील आपल्या फेसबुक अकाउंट वरून इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंम्बर यांच्याबद्दल पहिला दहशतवादी मोहम्मद अशी अत्यंत अवमानकारक व संवेदनशील मनाला सुन्न करणारी निंदनीय अशी पोस्ट केली आहे. त्यावर कठोर कारवाही करा अशी मागणी मुस्लिम सेवा संघाची निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
सम्पूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंम्बर यांच्याबद्दल अशी अवमानकारक पोस्ट टाकून जातीय सलोखा बरबाद करण्याचे अत्यंत खालच्या पातळीचे काम केले आहे. या पोस्ट मुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करीत ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. चुकीच्या विधानाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा दगडू जाधव या समाजकंटक, समाज विरोधी, गलिच्छ विचारी, अपराधी वृत्ती ठेवणाऱ्या दगडू जाधव समाजात भेदभाव जाती-धर्म वाद करण्याचा षडयंत्र नाकारता येत नाही असा चर्चेला सर्वत्र तुफान आले आहे. म्हणून अशा व्यक्तीवर कडक कारवाई करून भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मुस्लिम सेवा संघाच्या वतीने होत आहे. या निवेदनावर मुस्लिम सेवा संघ जिल्हा अध्यक्ष शेख कदीर शेख चाँद, मो.जमील, अय्यूब खान कोटकर, जहिर खान पठान, शेख शहजाद, शेख सलीम, अहमद खान, अकबर बागवान, अयाज खान, सय्यद तनवीर, जावेद खान, मो.मोसिन, अजमत खान, अनवर खान, सै सलमान, सै मुजीब, असलम शाह, नुसरत भाई अब्दुल्लह खान आणि सर्व मुस्लिम समाझ बांधव साह्य आहे.