Home यवतमाळ दारव्हा पोलिसांची अवैद्य दारू विरुद्ध धडक मोहीम…!

दारव्हा पोलिसांची अवैद्य दारू विरुद्ध धडक मोहीम…!

219

मात्र अवैद्य मोहफुल विक्रेत्यांना अभय

अशोक जोगदंड
ता.दारव्हा होळी व धुलीवंदनाचा सण आनंदाने साजरा व्हावा कुठेही भांडण तंटे होऊ नये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये या अनुषंगाने खबरदारी म्हणून दारव्हा पोलीस स्टेशन यांनी खबऱ्याकडून गोपनीय माहितीच्या आधारे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर तसेच दारू गाळणाऱ्या इसमावर दारव्हा पोलीस स्टेशन च्या वतीने दिनांक 13 /03/2025 रोजी मोठी कारवाई करत रामगाव हातनी वागद बु ब्रम्हनाथ जवळा तरनोळी तेलगव्हाण इत्यादी ठिकाणी दारूभट्टीवर रेड टाकून एकूण 2 लाख 68 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला 1) सुबिबाई तारासिंग चव्हाण वय 60 वर्ष रा. रामगाव हिच्या ताब्यातून मोहमाच सडवा गावठी हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण 47 हजार 750 रुपयाचा तर 2) प्रकाश नथुजी अंबुरे वय वर्ष 55 रा.हातनी याच्या ताब्यातून मोहमाच सोडवा गावठी हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण 41 हजार 400 रुपयाचा तर 3) ईदल जयराम जाधव 38 वर्ष रा.वागद बु याच्या ताब्यातून मोहमाच कळवा गावठी हातभट्टी दारू इतर साहित्य असा एकूण 29 हजार 900 रुपयाचा तर 4) आत्माराम रामजी तुंगर वय 62 वर्ष रा. ब्रह्मनाथ जवळा यांच्या ताब्यातून मोहमाच सडवा गावठी हातभट्टी दारू व इतर साहित्य एकूण 23 हजार 200 रुपयाचा तसेच 5) रोहिदास बाबाराव राठोड वय 38 वर्ष रा. तरनोळी यांच्या ताब्यातून मोहमाच सडवा गावठी हातभट्टी दारू काढण्याकरिता लागणारे साहित्य असा 41 हजार 850 रुपयाचा तर 6) खेमराज संजय राठोड वय 38 वर्ष रा. तेलगव्हाण यांच्या ताब्यातून मोहमाच सडला गावठी हातभट्टी दारू इतर साहित्य 39 हजार 300 तसेच 7) नारायण देविदास राठोड वय 38 वर्ष रा. तेलगव्हाण याच्या ताब्यातून मोहमाच सडवा गावठी हातभट्टी दारू 44 हजार 800 रुपयाचा तर एकूण 2 लाख 68 हजार 200 मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच आरोपीतांण विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले असून सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक कुमार चित्ता मा. अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यवतमाळ मा.एस.डी.पी.ओ. रजनीकांत सा.दारव्हा यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. विलास कुलकर्णी ठाणेदार पोलीस स्टेशन दारव्हा व त्यांच्या पथकाने केलेली आहे

बॉक्स
हात भट्टी गावठी दारू काढण्यासाठी ज्या साहित्याचे प्रमुख गरज असते ते म्हणजे मोहफुल जे एवढ्या सहजा सहजी मिळत नाही दारव्हा तालुक्यातील जंगलातही उपलब्ध नाही याची विक्री फक्त परवानाधारकच जनावरांसाठी करू शकतो मग मोहमाच चा एवढा मोठा साठा येतो कुठून ही तपासण्याची खरी गरज आहे मात्र कधीही मोहफुल विक्रेत्यावर कारवाई होताना दिसत नाही किंवा मोहफुल कुठून उपलब्ध झाले याचा तपास कुठ उल्लेख होतं नाही त्यामुळे गावठी हातभट्टी दारूचे व्यवसाय दारव्हा तालुक्यात वाढल्याचे दिसते