नांदेड / मुखेड , दि. ०८ :- ( राजेश भांगे )
अखिल भारतीय अंतर सांस्कृतिक संघ नागपुरच्या वतीने आयोजित अखिल भारतीय राष्ट्रीय न्रत्य स्पर्धा आणि महोत्सव या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धे मध्ये भारतीय लोककला या प्रकारा मध्ये गोंधळ हे न्रत्य सादर करून नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील रावी या गावची देवश्री दंमकोडवार या विद्यार्थ्यांनीने प्रथम पुरस्कार पटकावला आहे .
अखिल भारतीय अंतर सासंक्रतीक संघ नागपुर या संस्थेकडुन अखिल भारतीय राष्ट्रीय न्रत्य व महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धे मध्ये संपूर्ण भारतातुन न्रत्य स्पर्धक सहभागी झाले होते यात नांदेड जिल्ह्यातुन व मराठवाडा विभागातुन सात वर्षाच्या दैवश्री दंमकोडवार हिने सहभाग नोंदविला होता या स्पर्धे मध्ये भारतीय लोक कला या प्रकारात देवश्री ने महाराष्ट्रा ची लोक कला गोंधळ हे न्रत्य सादर केले .
देवश्री ने सादर केलेल्या या न्रत्याने सर्वांची मने जिंकली असुन या स्पर्धेत तिने देशात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार पटकाविले असुन देवश्री हिने कपुर डांस अकॕडमी नांदेड ची विद्यार्थ्यांनी असुन तिला न्रत्य गुरू राजेश कपुर यांच्या मार्गदर्शना खाली म्रणाल कपुर यांनी प्रशिक्षण दिले
देवश्री हि कुंटुर आणि घुंघराळा तालुका नांयगांव चे ग्राम विकास अधिकारी राजेश दंमकोंडवार यांची सुपुत्री आहे , देवश्री च्या यशा बद्दल तिचे न्रत्य गुरू राजेश कपुर आणि म्रणाल कपुर यांनी अभिनंदन केले तसेच तिच्यावर सर्वच स्तरातुन कौतुकाचे वर्षाव होत आहे. पोलिसवाला आॕनलाईन मिडिया व ग्रूप तर्फे देवश्री चे प्रथम पुरस्कार मिळविल्या बद्दल खुप खुप अभिनंदन.