तहसीलदार सुनीता नेर्लीकर यांच्या हस्ते समर्थ संस्थेच्या पुरस्काराचे वितरण
गिरीश भोपी
समर्थ बहुद्देशीय विकास संस्था व न्यूट्रीफील हेल्थ प्रोडक्ट प्रा. लि. कंपनी यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या “व्यसनमुक्त भारत” हे अभियान राबविले जाते. या अभियान अंतर्गत व्यसनमुक्तीदुत या पुरस्काराचे वितरण कोल्हापूरच्या तहसीलदार सुनीता नेर्लीकर व धर्मादाय आयुक्त कार्यालय सोलापूरचे अधीक्षक विशाल क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते कोल्हापूर येथे पुरस्कार मानकरी श्री. दिलीप गणपती कांबळे, मलकापूर, श्री. विष्णू भिवसन शेवाळे देवळा जि. नाशिक, श्री. सचिन शिवाजी घाडगे, सातारा, श्री. किशोर लक्ष्मण वाघमारे माऊलीनगर ता. गोवराई, श्री. रविंद्र विठ्ठल गोसावी, कळंबोली, नवी मुंबई, श्री. संजय पुंजाजी मत्ते, पुसद जि. यवतमाळ, श्री. हरिभाऊ विठ्ठलराव परिहार, चिखली जि. बुलढाणा, श्री. डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे, कणकवली जि. सिंधुदुर्ग, श्री. डॉ. कौस्तुभ वरुडे, विटा खानापूर, श्री. डॉ. आश्लेषा चव्हाण, कसबा बावडा ता. करवीर, श्री. गुंडप्पा काशीद, कोल्हापूर, श्री. रोहित भिकाजी डवरी, पेठ वडगाव, ता.हातकणंगले, सौ. कुमिता लालचंद तवर, पाटस ता. दौंड, शंकरराव शेजवळ, पाली ता. कराड, श्री. अनिल चव्हाण, सोरडी ता. जत, अतुल डांगमळी, हडपसर पुणे यांना देण्यात आला.
यावेळी तहसीलदार सुनिता नेर्लीकर यांनी समर्थ संस्थेने व्यसनाचा काळोख भेदण्यासाठी व्यसनमुक्ती ची मशाल हाती घेतली हे कौतुकास्पद आहे. सीमेवरती रक्षण करणाऱ्या जवानांना नंतर व्यसना सारख्या देशाच्या शत्रू बरोबर लढण्याचे काम करणारे तुम्ही एक देशाचे जवानच आहात. असे उदगार काढले, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे सोलापूर धर्मादाय आयुक्तचे अधीक्षक विशाल क्षीरसागर यांनी सामाजिक सेवा संस्थांची निर्मितीचा उद्देशच समाज कार्य करण्यासाठी आहे. समर्थ संस्था ही एक सकारात्मक संस्था असून, प्रत्येक संस्थेने या संस्थेसारखे समाजोपयोगी काम करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद शिंदे, प्रास्ताविक सादिक शेख व आभार प्रदीप कुंभार यांनी मानले यावेळी संस्थेचे दिगंबर साळुंखे सर, सुहास पाटील, देवदास जाधव, संदीप कुंभार, विकास पाटील, डॉ.सोनाली कुरणे, अस्लम शेख, सागर देसाई, भगवान कांबळे, संतोष पवार, रोहित डवरी, उत्तम कांबळे सर, यांचेसह संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.