Home जळगाव एक शाम शाहीन बाग के नाम

एक शाम शाहीन बाग के नाम

129

सुप्रीम कॉलनी व फातिमानगर हजारो महिलांची उपस्थिती…

रावेर – शरीफ शेख

जळगाव , दि. १२ :- संविधान बचाव नागरी कृती समिती महिला शाखा अंतर्गत जळगाव शहरात सुरू असलेल्या एक शाम शाइन बाग के नाम या कार्यक्रमांतर्गत मंगळवारची रात्र सुप्रीम कॉलनी व फातिमानगर येथील महिलांनी एकत्रित येऊन सुप्रीम कॉलनी येथे संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या दिल्ली येथील शाहीन बाग महिलांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी व त्यांच्या सोबत आम्हीसुद्धा सहभागी असल्याचे प्रतीक म्हणून जळगाव शहरात विविध ठिकाणी महिला अशाप्रकारे एकत्रित होऊन त्या महिलांना त्या शाहीन बाग येथील महिलांना प्रोत्साहित करीत आहे.

*सुप्रीम कॉलनी येथील या महिलांनी व मुलींनी साधला संवाद*

महिला व मुली यांनी सी ए ए, एन आर सी व एन पी आर याबाबत माहिती देऊन एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एनपीआर ला बायकॉट करण्याचा ठराव संमत केला
यात प्रामुख्याने मुबशरा खटिक, खदीजा चौधरी ,सबा कौसा चौधरी, मोहम्मद साद, नुरजहा हारून, तबस्सुम सैय्यद, निखत तनवीर मनियार, मसिरा शेख हनीफ, महेवीश खान मुलतानी, बुशरा शेख हनीफ,तहेरिम फातेमा,अनम निषाद,हुमेरा फारूकी व सहकारी, काफिया शाह, शरीया खान ,जमीला खान, शबाना परवेज आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .

*यांची होती उपस्थिती*

महिलांचा कार्यक्रम सुरू असला तरी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संविधान समिती व मुस्लिम मंच चे गफ्फार मलिक, करीम सालार फारुक शेख, बशीर बुर्‍हानी, अनिस शाह, रफिक पटनी, अन्वर सिकलिगर, सनेर सय्यद यांची होती उपस्थीती.

*यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला*
शेरु काज़ी,कदीर पटेल, अफजल मन्यार ,वहीद खान, छोटु पटेल, सोहेल अमीर खान ,अजमल नुरा बागवान, जमील खाटीक, इमरान बागवान, अकील शहा, मुजाहिद शेख ,अकील मनियार, रफिक तंबोली, याकूब चौधरी, वसीम शिकलगर, आसिफ मणियार, रशिद कुरेशी ,मोहसीन शेख, तनवीर अहमद, सिराज शेख व हारून खान यांनी प्रयत्न केले.