नांदेड , दि. १२ ( राजेश भांगे ) :- सद्गुरू प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा बहादरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड या शाळेचे विज्ञान प्रदर्शन 2020 मध्ये यश नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे दिनांक ११-०२-२०२०. रोजी आदिवासी विकास विभाग अमरावती एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत शासकिय माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथे दोन दिवसीय विज्ञान व चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले होले तरी या प्रदर्शनात जिल्ह्यातील एकुण छत्तिस आश्रम शाळा सहभागी झाल्या होत्या या मध्ये शासकिय माध्यमिक आश्रम शाळा उमरी बाजार या आश्रम शाळेने प्रथम क्रमांक व शासकिय माध्यमिक आश्रम शाळा बुधड या आश्रम शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला.
तरी उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरू प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा बहादरपुरा तालुका कंधार या शाळेतील वर्ग दहावीचे विद्यार्थी शिवानंद लक्ष्मण उलगुलवाड व ज्ञानेश्वर तोलबा भिसे या विद्यार्थ्यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट जिल्हा नांदेड यांनी आयोजित केलेल्या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ऊर्जा रूपांतर व पुनर्वापर या विषयावर अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे हा बहुघटकीय ऊर्जा प्रकल्प तयार केला समाजाला या ऊर्जा प्रकल्पाचा कसा फायदा होतो व ऊर्जा संकटावर कशी मात करता येते वाढणारे इंधनाचेभाव यातून समाजाची आर्थिक बचत कशी करता येते याचे महत्त्व या प्रदर्शनातून शालेय विद्यार्थी नागरिक महिला अधिकारी पदाधिकारी यांना प्रयोगाच्या माध्यमातून सादरीकरण करून दाखवले त्यात त्यांचा किनवट प्रकल्प जिल्हा नांदेड येथून तृतीय क्रमांक मिळाला प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी माननीय श्री गोयल साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या सादरीकरणासाठी मार्गदर्शन श्री श्रीनिवार डी .बी. श्री वाघमारे श्री के.व्हि. प्रदीप इंदुरकर सर यांचे सहकार्य लाभले या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री विशाल टेकाळे सर श्री जाधव सर व संस्थेचे संस्थाध्यक्ष भाई दत्तात्रय गुरुनाथराव कुरडे संस्था सचिव डॉ.शीतल ताई कुरुडे मा.जि.प. सदस्या संजीवनी कुरुडे यांनी विद्यार्थी व सहभागी शिक्षकांचे अभिनंदन केले.