Home जळगाव मुस्लिम मंच च्या ४६ व्या दिवशी मेकॅनिकल युनियन च्या सभासदांचा सक्रिय सहभाग

मुस्लिम मंच च्या ४६ व्या दिवशी मेकॅनिकल युनियन च्या सभासदांचा सक्रिय सहभाग

141

जमि खोदो हमारी हड्डीयो के ढेर निकलेंगे – रागिब ब्यावली

रावेर (शरीफ शेख)

जळगाव मुस्लिम मंच द्वारा सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा ४६ वा दिवस मेकॅनिकल युनियन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या सक्रिय सहभागाने भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध नोंदविण्यात आला.

उपोषणाची सुरुवात फारुक शेख यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता खालील टेलर यांच्या दुवाने करण्यात आली.

*मेकॅनिकल युनियनचा सहभाग*

मेकॅनिकल युनियन संघटना सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न आहे त्या संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी स्वेच्छेने आपले काम धंदे बंद करून उपोषणात सक्रिय सहभाग नोंदविला अध्यक्ष शेख युसुफ यांच्या नेतृत्वाखाली अबूबकर खान ,बशीर खान गफार खान, लतीफ खान उमरखान, गफ्फार खान ,लतीफ खान, उमर खान, अकील खान, करीमखान ,नजीर शेख करीम, कलीम बेग रमजान बेग, मोहम्मद खलील शेख हुसेन, गफार खान कलीम खान, सय्यद आमीर, मोहम्मद रफिक, अब्दुल करीम आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला.
जळगाव शहरातले प्रसिद्ध राष्ट्रीय कवि रागीब ब्यावली यांनी
जमीन ये हिंद कि तहेसे हजारो शेर निकलेंगे ।
मोहिनुद्दीन चिश्ती खाजाऐ अजमेर निकलेंगे ।
मेरे अजदाद ने मर कर भी, यह मिट्टी नही छोडी
जमी खोदो हमारी हड्डीयो के ढेर निकलेंगे ।
ही कविता सादर करून आपल्या एन आर सी ला विरोध नोंदविला.
त्यानंतर माइल पालधवी, खालीद मेकॅनिक, कलीम पेंटर, रहमतुल्ला, अल्लाउद्दीन शेख, अश्फाक पिंजारी, अकिल मनियार, हमिद जनाब, शाहीद सय्यद, हाफिह अब्दुल रहिम, शमीम बंगाली, मज़हर पठाण, फारुक शेख शरीफच्‍या बापू जमील भाई भंगारवाले यांनी उपोषनार्थी सोबत संवाद साधला.

*अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना निवेदन*

मेकॅनिकल संघटनेच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एन पी आर ची अंमलबजावणी करण्यात येऊ नये एन आर सी कायदा भारतात लावता कामा नये व सीएए मध्ये हे सुधारणा करावी अथवा रद्द करावे अशा तीन मागण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संपूर्ण उपोषणाचे सूत्रसंचालन अध्यक्ष अल्ताफ शेख हे करीत आहे.
थर. ख व त्यांचे सहकारी.