गिरीश भोपीमुंबई , दि. १२ :- नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ’ ‘ (रजि. )वाशी,नवीन पनवेल येथे संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी व पालखी सोहळा,सभासद व पालक गुणगौरव, वार्षिक सर्वसाधारण सभा ,महिला हळदी कुंकू समारंभ, जन्मबंध मार्गदर्शन व आरोग्य शिबीर असा बहुरंगी कार्यक्रम आदर्श शिक्षण समुहाच्या डी.डी. विसपुते महाविद्यालय, विचुंबे, देवद,नवीन पनवेल येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पुजन व पुष्पहार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्पण व दिप प्रज्वलनाने झाली.यावेळी गणेश वंदना व स्वागत गीत गाऊन पाहुण्यांच्या उपस्थितीत ढोल ताश्यांच्या गजरात पालखीची मिरवणूक कार्यक्रमाच्या ठिकाणाहून ते देवद गावातील विठ्ठलाचे मंदिर अशी भव्यदिव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली,यावेळी पाहुण्यांनी व समाज बाधंवानी पालखी सोहळ्यात उस्फुर्त पणे सहभागी झाले.संत नरहरी महाराज यांच्या वेशभूषेत मास्टर प्रियम भामरे व कु.लेखा सतिश विसपुते हे होते. जणू संत नरहरी महाराज कार्यक्रम स्थळी अवतरले असे उपस्थितीतांना वाटत होते.
या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक मंडळाचे सचिव शांताराम सोनारसर यांनी केले.याप्रसंगी त्यांनी मंडळाची वाटचालविषयी व आजीव सभासद ,युवा वर्गाचा मंडळात सहभाग इ. विषयावर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या व्यक्ती व विद्यार्थ्यांना तसेच सेवानिवृत्त झालेल्या समाज बाधवांचा स्मृती चिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते गौरविण्यात आले. या अनुषंगाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील उत्कृष्ट पध्दतीने सादरीकरण करण्यात आले. मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रमुख पाहुणे श्री बापुसाहेब चंद्रकांतजी सोनार यांनी कार्यक्रमाचे व मंडळाच्या वाटचालीविषयी कौतुक केले आणि मंडळाने कार्यक्रमासाठी बोलविल्याने मंडळाचे आभार मानले. यावेळी धुळे येथे उभारण्यात येणाऱ्या संत नरहरी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी आदर्श शिक्षण समुहाच्या वतीने रु ५१,०००/-चा धनादेश महापौर श्री चंद्रकांत जी सोनार यांच्या कडे आदर्श शिक्षण समुहाचे अध्यक्ष मा.श्री धनराज जी विसपुते व सोबत सौ.संगिताताई विसपुते व श्री नानासाहेब महेंद्र जी विसपुते यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.यावेळी समाजबांधवाना सुध्दा मदतीसाठी आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब धनराज जी विसपुते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत मागील आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी मागील वर्षी२४फेब्रुवारीला धुळे येथे माजी लोकसभा अध्यक्षा मा.सुमित्राताई महाजन यांच्या शुभहस्ते कै.बापुसाहेब डी. डी.विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कसे करण्यात आले याचा आढावा घेत संत नरहरी महाराजांच्या पुतळा उभारणीतील सर्वाची भुमिका समजावून दिली. यानंतर शिस्तबद्ध पध्दतीने वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
सोहम फाउंडेशन संचलित न्यू स्पंदन मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल पनवेल तर्फे आयोजित करण्यात आले होते यात हाडांची घनता (बोन मिनरल डेंसिटी),रक्तगट तपासणी, ब्लडशुगर, डोळे तपासणी (डॉ. नायर नेत्रालय) इ.कार्यक्रम शिबिरा स्थळी आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात एकूण१६०जणांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. याकामी डॉ. सतिष विसपुते(ओर्थो )व डॉ. दिपाली सतिश विसपुते तसेच हेमकांत सोनार यांचे सहकार्य लाभले. महिला मंडळ आयोजित पाककला स्पर्धेतील विजेत्यांना देखील पारितोषिक देण्यात आली. या कार्यक्रमात यानंतर खानदेशी पध्दतीने तयार करण्यात आलेल्या सुग्रास भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. कार्यक्रमाची सांगता.
कार्यक्रम यशस्वी करणे साठी
नवी मुंबई सुवर्णकार मंडळ व नवी मुंबई महिला सुवर्णकार मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी सुत्रसंचालन डॉ.सिमा कांबळे यांनी केले तर मंडळाचे सचिव यांनी उपस्थितांचे आभार मानले..कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् ने झाली.