Home मुंबई अन त्या मनोरुग्णा ने पोलीस कर्मचाऱ्याचा हातच चावून तोडला

अन त्या मनोरुग्णा ने पोलीस कर्मचाऱ्याचा हातच चावून तोडला

158

पोलीस रुग्णालयात दाखल

अमीन शाह

मुंबई , दि. १३ :- नागपाडा जंक्शन परिसरातील नागपाडा पोलीस ठाण्यात एका नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णाने पोलीस कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताच्या बोटाचा कडाडून चावा घेतला. ज्यामुळे पोलिसाच्या बोटाचा अक्षरशः तुकडा पडला आहे. जनार्दन साखरे असे या जखमी पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.
दरम्यान, शफिक अहमद सुलेमान (४५) नावाचा मनोरुग्ण नग्न अवस्थेत नागपाडा जंक्शन परिसरात गोंधळ घालत होता. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन साखरे हे ड्युटीवर होते. मनोरुग्णाचा हा गोंधळ पाहून घटनास्थळी जमलेल्या जमावाने पोलिसांना मदतीची मागणी केली. त्यानंतर जनार्दन साखरे मदतीसाठी गेले असता मनोरुग्णाने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोटाचा कडाडून चावा घेतला. पोलिसाच्या बोटाचा तुकडा पडला आहे.
घटनेनंतर पोलीस कॉन्स्टेबलला तातडीने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले असून मनोरुग्ण सुलेमानला उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती नागपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी दिली. मनोरुग्ण सुलेमान याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान पूर्वी ठाण्यात राहत होता, मात्र आता तो वडाळ्यात राहत आहे.