Home मराठवाडा लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक , “सर्वत्र खळबळ”

लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक , “सर्वत्र खळबळ”

130

अमीन शाह

नांदेड , दि. १३ :- पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. तुकाराम विठ्ठलराव जायभाये (वय 48. रा, व्यवसाय) व महेश भाऊराव आडे (वय 31) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
लोकसेवक तुकाराम जायभाये नांदेड पोलीस दलात पोलीस नाईक कार्यरत आहे. जयभाये येथील विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर, महेश आडे हे पोलीस कर्मचारी असून तेही भाग्यनगर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांचे मुलास चेक बाउंस प्रकरणी अटक झाली आहे.
या प्रकरणी तक्रारदार यांचे मुलाचे जामीन होण्याकरीता व त्यास हातकड़ी न लावण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तसेच लोकसेवक आडे यांनी त्यांच्यामार्फत लाच मागून 10 हजार रुपयांची घेतली. दरम्यान एलसीबीच्या कारवाईत त्यांना लाच घेताना पकडण्यात आले आहे.
नांदेड लाच लुचपत विभागाच्या पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.