Home जळगाव ‘सोशल मीडीया परिवर्तनाचे साधन’ – डॉ .डी.बी. पाटील

‘सोशल मीडीया परिवर्तनाचे साधन’ – डॉ .डी.बी. पाटील

220

शरीफ शेख

रावेर , दि. १३ :- येथील श्री.व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक डॉक्टर डी.बी.पाटील यांचे “सोशल मीडियाचा वापर आणि तरुण”
या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉक्टर डी. बी. पाटील यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की , सोशल मीडियाचा प्रत्येकाने सकारात्मक उपयोग केला पाहिजे. या माध्यमातून रोजगाराची उत्तम संधी शोधता येते .सर्वसामान्य, शोषित ,वंचितांना न्याय देण्यासाठी सोशल मीडिया महत्त्वाचे साधन ठरू शकते. समाजातील अनेक विविध समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाचे आहे. असे मत डॉक्टर डी.बी. पाटील यांनी या व्याख्यान प्रसंगी मांडले . सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉक्टर जी.आर. ढेंबरे हे होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक एस .डी. धापसे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक एस.बी. गव्हाड यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी .व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक एस .बी. धनले , सहायक विद्यार्थी विकास अधिकारी ,प्राध्यापक एन .ए. घुले ,डॉक्टर बी.जी. मुख्यदल, प्राध्यापक सी .पी. गाढे ,प्राध्यापक एस .बी. गव्हाड यांनी परिश्रम घेतले.