शरीफ शेख
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचा सुद्धा सक्रिय पाठिंबा.
जळगाव मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरु असलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषण सुरू असून गुरुवारी त्या उपोषणाचा सत्तेचाळीसावा दिवस होता या दिवशी मन्यार बिरादरी जळगाव तसेच मनियार मोहल्ला, खाटीक वाडा व नारखा मोहल्ला या तिघी मोहल्ल्यातील पुरुष व महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपला विरोध उपोषणा द्वारे प्रकट केला.
*४७ व्या दिवशीही उपोषण सुरूच*
जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख व महानगराध्यक्ष सय्यद चाँद यांच्या नेतृत्वाखाली अफजल पठाण, शेख युनूस खाटीक व हाजी यूनुस यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला सुरुवात करण्यात आली या उपोषणात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उपोषण स्थळी सक्रिय सहभाग घेऊन आपला विरोध नोंदविला.
उपोषणाची सुरवात फारुक शेख यांच्या कुराण पठाणाने तर सांगता अल्ताफ शेख यांच्या दुवा ने करण्यात आली.
*यांनी केले मार्गदर्शन*
मंगलाताई पाटील, शालिनीताई सोनवणे, नीलोफर इक्बाल, वाय एस महाजन, जोया कामिल शाह, मरियम हाफिज रहीम, मुकुंद सपकाळे, आयशा मुक्तार, उजमा खाटीक, फारुक शेख, करीम सालार, अश्फाक पिंजारी, समरीन शकील, मेहमुदा शकील व अकील मणियार यांनी मार्गदर्शन केले तर अलफैज़ पटेल यांनी आजादी चे नारे वदवून घेतले.
*उपोषणस्थळी यांची होती विशेष उपस्थिती*
सय्यद चाँद सय्यदमीर, डॉक्टर अमानुल्ला शाह, सचिन धांडे, मेहमूद खाटीक, शौकत पेंटर, साहेबराव वानखेडे, सुरेश तायडे, मजर पठाण, अयाज मोहसीन, शरीफ शाह बापू, राष्ट्रवादीच्या सौ सुमन ताई बनसोडे, मालती सैंदाणे, शालिनी सोनवणे, सीमा शैलेश रॉय ,ममता सोनवणे, सुवर्णा पवार, सीमा गोसावी,जयश्री बाविस्कर सौ मनीषा देशमुख, सौ सुवर्णा सोनवणे, सिताराम यादव, अन्वर सिकलगर, सय्यद शाहिद, नीलोफर रुबीना, इक्बाल मोहम्मद, आरिफ उस्मान, शेख असलम, खलील टेलर, विलास पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
*उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन*
सय्यद चाँद अमीर व सायमा उमर शेख यांच्या नेतृत्वाखाली अफजल पटवे, युनुस खाटीक, अन्वर शिकलकर, हाजरा शेख, रुबिना इक्बाल, सुलताना शेख, युनूस आलिशा,मुनज़्ज़ा सलीम, रुबिना इक्बाल ,अनिसा गुलाम आदींनी उपजिल्हाधिकारी भारदे यांना निवेदन दिले.