Home उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर...

मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा रावेर तालुका येथे जाहीर निषेध…!

153

शरीफ शेख

जळगाव / रावेर , दि. १४ :- राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा राजे शिवाजी महाराज चौक, रावेर व शहरवाशी यांच्या तर्फे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळयाची झालेली विटंबनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. सदरील घटना ही मध्यप्रदेश येथील छिंदगाव जिल्यातील सौसंर गांवी झालेली आहे’ येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे.सी. बी.च्या सहाय्याने काढण्यात आला . त्यामुळे शिवाजी महाराजांच्या पूतळयाची विटंबना झाली. त्यामुळे शिवप्रेमी भक्तांची भावना दुखावली सदरचा पुतळा जे.सी. बी. च्या सहाय्याने काढणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी .

राजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा व अँड. लक्ष्मीकांत शिंदे , राजेश शिंदे, प्रकाश पाटील,विजय महाजन,जितेंद्र महाजन, राम शिंदे, शाम शिंदे, संदीप शिंदे,दिपक शिंदे, अमोल पाटील, प्रदीप शिंदे ,रवींद्र महाजन, कल्पेश महाजन,विकी महाजन यांनी रावेर तहसीलदारांना निवेदन दिले.