Home मराठवाडा बार मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास तीन महिन्यांची शिक्षा….!!

बार मध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास तीन महिन्यांची शिक्षा….!!

142

सययद नजाकत – बदनापूर

जालना , दि. १४ :- तालुक्यातील सेलगाव येथील साई परमिट रूम मध्ये दहा वर्षांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणात आरोपीस २ वर्ष ३ महिने शिक्षा व ३ हजार पाचशे रुपये दंड बदनापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथम दंडाधिकारी भाग्यश्री पाटील ठोठवला आहे या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सचिन सूर्यवंशी यांनी काम पहिले असून आरोपीचे नाव सय्यद इरफान अली सय्यद दिलावर असे आहे.
बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर येथील नंदकिशोर हरिभाऊ दाभाडे यांनी जालना औरंगाबाद महामार्ग रस्त्यावर सेलगाव येथे साई परमिट रूम चालविण्यासाठी किरायाने घेतलेले होते व ७ फेबूर्वरी २०१० रोजी नित्याप्रमाणे रात्री बंद करून गावाकडे आले असता ८ फेबूर्वरी रोजी सकाळी हॉटेल उघडण्यास गेले असता अज्ञात इसमाने हॉटेलचे कुलूप तोडून जनरेटर,ग्यास टाकी,भांडे,ग्यास शेगडी व विदेशी दारूच्या बाटल्या असा एकूण एक लाख दोन हजाराचा माल चोरून नेल्याची तक्रार बदनापूर पोलीस ठाण्यात नोंदविली असता पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांनी सखोल तपास करून आरोपी सय्यद इरफान अली सय्यद दिलावर अली विरुद्ध ६१/२०१० अन्वये दोषारोप पत्र बदनापूर न्यायालय प्रथम दंडाधिकारी समोर दाखल केले या प्रकरणाचा निकाल तब्बल दहा वर्षांनी लागला असून या प्रकरणात प्रथम न्यायदंडाधिकारी भाग्यश्री पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली असता सर्कारपक्षातर्फे सचिन सूर्यवंशी यांनी मुद्देसूद बाजू मांडली असता न्यायालयाने आरोपीस सदर प्रकरणी दोषी ठरवून कलम ४५७ प्रमाणे दीडवर्ष शिक्षा व २ हजार दंड,कलम ३८० प्रमाणे ६ महिने शिक्षा व १ हजार दंड तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे ३ महिने शिक्षा व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे,या प्रकरणात पाच साक्षीदार तपासण्यात आले .