सययद नजाकत
जालना , दि. १४ :- भोकरदन तालुक्यातील अवैध धंदे विरूद्ध पोलिसांचे धडाकेबाज कारवाया सुरू आहे तालुक्यात अवैध धंदे खपुन घेणार नाही अशी कठोर भुमिकेत पोलीस प्रशासन आहे तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक एस चैतन्य यांनी पोलीसांना आदेश दिले यातीलच खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याची माहीती पोलीसांना मिळाली सिपोरा बाजार परीसरात गुटखा विक्री करणारा अपे रिक्षा सहीत एकुण 97 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला या विषय पोलीस सुत्रांकडुन मिळालेली अशी की सिपोरा बाजार परीसरात अपे रिक्षात अवैध मार्गाने गुटख्याची वाहतुक सुरू असल्याची माहीती मिळताच सापळा लावला आणी अपे रीक्षा थांबुन चौकशी केली असता गोवा, गुटखा, राजनिवास गुटखा,आढळून आले असे एकुण 97 हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करून अन्न औषधी प्रशासनाचे अधिकारी यांच्या फिर्यादी वरून दिनकर अशोकराव कुदर यांच्या विरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई पोलिस अधिक्षक एस चैतन्य, अप्पर पो अधिक्षक समाधान पवार,यांच्या आदेशाने व पो.उप.विभागीय अधिकारी सुनिल जय भाये, पो.नि.दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स.काॅ ठाकुर, संदीप उगले, विजय जाधव, संजय शिरसागर, यांनी केली आहे पुढील तपास संदीप उगले हे करीत आहे.