या विषयावर मौलाना आझाद कॉलेज येथे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
अब्दुल कय्युम
औरंगाबाद ,दिनांक १४ फेबुरवारी २०२०. मौलाना आझाद कॉलेज डॉ. रफिक झकेरिया कॅम्पस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “औरंगाबाद दकन मे उर्दू गज़ल – माझि ता हाल” या विषयावर मौलाना आझाद कॉलेज येथे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मझहर फारुकी हे होते. या प्रसंगी उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी व्यावसायिक विकास केंद्र, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू वियापीठ हैद्राबाद चे संचालक प्रा. डॉ. मो. अब्दुल समी सिद्दीकी यांचे बीज भाषण झाले. या प्रसंगी प्रा. डॉ. सय्यदा शर्फुन निहार (चेरमन अभ्यास मंडळ. सदस्य विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व खान मुकीम खान (ऑल इंडिया रेडिओ) यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. शर्फुन निहार यांनी आपल्या शोध निबंधामध्ये उर्दू गज़ल च्या प्रवासावर व औरंगाबाद शहरातील नामवंत व ख्यातनाम शायरांच्या कारकिर्दीवर सखोल प्रकाश टाकले. डॉ. अब्दुल समी सिद्दीकी यांनी नवीन पिढी मध्ये लिहणाऱ्यां युवकांवर चर्चा केली. खान मुकीम खान यांनी उर्दू शायरी च्या विकासामध्ये या शहराचे योगदान या विषयावर प्रकाश टाकले. डॉ. अदिती भट्टाचार्य, डॉ. राजन शिंदे, डॉ. सय्यद असिफ, डॉ. काझी नवीद, डॉ. अब्दुल रब, अनिस अहमद, डॉ. फय्याज फारुकी, डॉ. रेहाना बेगम, डॉ. शाहिना बेगम, मुशीर नदवी व सोहेल झकीऊद्दीन यांनी सदर चर्चासत्राचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्दुल रब यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजन शिंदे यांनी प्रस्तुत केले.